होळीमुळे बाजारसमित्या ५ दिवस बंद !

Shares

खरिपातील पीक शेवटच्या टप्यात असले तरी खरीप बरोबर रब्बी पिकांची देखील आवक वाढली आहे. खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, हरभरा या मुख्य पिकांची आवक मोठ्या संख्येने होत आहे. तर आता होळी निम्मित कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत.

लासलगाव, लातूर, नाशिक, सोलापूर, मालेगाव येथील बाजारसमित्या बंद राहणार आहेत. होळी निम्मित दरवर्षी बाजारसमित्या बंद असतात. यामध्ये पणन महामंडळाची महत्वाची भूमिका असते. परंतु स्थानिक पातळीवर बाजार समिती प्रशासन निर्णय घेते.

त्यामुळे काही बाजारसमित्या २ दिवस तर काही बाजारसमित्या ५ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी थोडा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

होळी निमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे ५ दिवस बंद असणार आहेत. गुरुवारपासून येथील व्यवहार बंद राहणार आहेत.

काही बाजारसमित्या २ तर काही ५ दिवस बंद

सलग ५ दिवस व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. भाजीपाला आणि फळांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. तर कांदा नगरी असलेल्या लासलगावातील कांद्याचे व्यवहार हे २ दिवस बंद राहणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निर्णय हा स्थानिक पातळीवर झालेला आहे.

पुणे बाजारसमिती व्यवहार सुरु राहणार

मध्यंतरी दीपावली दरम्यान पुणे येथील बाजारपेठ ही तीन दिवस बंद होती. मात्र, सध्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतीमालाचे काय ?

होळी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद राहणार असले तरी भाजीपाला तसेच इतर किरकोळ व्यवहार हे सुरु राहजतील. बाजार समित्यांमध्ये सध्या हरभरा, तूर आणि सोयाबीनची मोठ्या संख्येने आवक होत आहे. तर आधीच शेतमालाच्या दरांमध्ये सतत चढ उतार होत असल्यामुळे या बंद नंतर काय दर असेल हे पाहावे लागणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *