या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

Shares

शेतकरी पारंपरिक पिकां व्यतिरिक्त इतर औषधी, मसाले पिकांच्या लागवडीकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. तर आपण आज अश्या पिकाची माहिती घेणार आहोत ज्याचा वापर औषधे बनवण्यासाठी तसेच साबण, चॉकलेट, टूथपेस्ट आदी बनवण्यासाठी केला जातो. तर पुरणपोळी, मिठाई त्या शिवाय अपूर्ण आहेत. ते म्हणजे जायफळ.

जायफळाचे अनेक फायदे असून या पिकांवर कीड व रोगाचा फारसा उपद्रव होत नाही. तसेच या पिकाची आंतरपीक म्हणून देखील लागवड करता येते.

जायफळाची माहिती

  • जायफळ २० मीटर पर्यंत वाढणारे एक सदापर्णी झाड आहे.
  • जायफळ यामध्ये नर आणि मादी असे २ वेगवेगळे प्रकार असतात. तर जायफळाच्या बागेत ५० % मादी, ४५% नर तसेच ५ % संयुक्त फुले असणारी असतात.
  • जायफळाची फळे चिकूच्या आकाराची असली तरी ती गुळगुळीत व पिवळसर असतात.
  • फळांच्या टरफलाचे लोणचे, चटणी मुरब्ब्यासाठी, जायफळ व जायपत्रीचा वापर मसाल्यात, मिठाईत केला जातो.
  • जायफळाच्या तेलाचा वापर हा चोकोलेट, औषधें, साबण बनवण्यासाठी करतात.

जमीन व हवामान

  • जायफळ हे उष्ण कटिबंधातील झाड आहे.
  • या न पिकास दमट हवामान व २५०० ते ४००० मि.मी. पर्यंत पाऊस उत्तम ठरतो.
  • अतिथंड म्हणजे १० सेंटिग्रेड तसेच त्याखाली तसेच अतिउष्ण म्हणजे ४० सेंटिग्रेडपेक्षा अधिक तापमान पिकास मानवत नाही.
  • जायफळाचे पीक समुद्रसपाटीपासून ७५० मी. उंचीपर्यंत घेता येते.
  • रेताड गाळमिश्रीत रेताड, वरकस अशा विविध प्रकारच्या परंतु उत्तम निचर्‍याच्या जमिनीमध्ये अधिक चांगले येते.
  • पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन अधिक मानवते.
  • जायफळाच्या झाडाला सावलीची गरज असल्यामुळे हे पीक आंतरपीक म्हणून घेता येते.

लागवड आणि व्यवस्थापन

  • जायफळाची लागवड करतांना ९० सेंमी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे.
  • बियांपासून तयार केलेली रोपे हे नराचे किंवा मादीचे आहे ते फुले येऊ लागल्यावरच कळते.
  • फळे फक्त मादी फळास लागतात. फुले सहा ते सात वर्षांनंतर येऊ लागतात.
  • रोपे करण्यासाठी जायफळाचे ताजे बी वापरावे. बी रुजवण्यासाठी १५ सेंटिमीटर उंच, एक ते दीड मीटर रुंद व आवश्यक त्या लांबीचे वाफे तयार करावेत.
  • वाफे तयार करण्यासाठी माती व वाळू यांचे योग्य मिश्रण वापरावे. तयार केलेल्या वाफ्यावर जायफळाचे बी रुजण्यास सुरुवात होते.
  • १० ते १५ दिवसांनी रोपे प्लास्टिकच्या पिशव्या लावण्यायोग्य होतात.
  • सुमारे एक वर्षांची रोपे लागवडीयोग्य होतात. जायफळाची अभिवृद्धी कलमांद्वारेही करता येते. भेटकलम, मृदकाष्ठ कलम अशा कलमांच्या पद्धती वापरून जायफळाची अभिवृद्धी करता येते.
  • महत्त्वाचा फायदा म्हणजे नर व मादीची हवी तेवढी झाडे लावता येतात.

काढणी आणि उत्पन्न

  • जायफळाची टरफले वेगळे करून जायपत्री अलगद काढावी.
  • बरीचशी जायफळे पावसाळ्यात तयार होत असल्याने उन्हात वाळवता येत नाहीत. अशावेळी बिया व जायपत्र मंद उष्णतेवर वाळवाव्यात.
  • जायपत्री ६ ते ८ दिवसांत, तर बिया १५ दिवसांत वाळतात.
  • पूर्ण वाढीच्या मादी झाडापासून ५०० ते ८०० फळे मिळतात. पंचवीस वर्षांपर्यंत उत्पन्न वाढत जाते.
  • पंचवीस वर्षांच्या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात.
  • ६० ते ७० वर्षे या झाडापासून किफायतशीर उत्पन्न मिळत राहते.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *