बैलगाडा शर्यत सुरु असतांना भीषण अपघात, बैलगाडी घुसली थेट प्रेक्षकांमध्ये

Shares

रायगडाच्या ( Raigad ) समुद्र किनारी बैलगाडी शर्यत सुरु होताच भीषण अपघात झाला. सर्वोच्च न्यायालयाने ( High Court) बैलगाडी शर्यतीला ( Bullock Cart Race) सशर्त परवानगी देताच अनेक ठिकाणी कोरोना मुळे बैलगाडा ( Bullock Cart) शर्यतीसाठी परवानगी नव्हती मात्र आता बैलगाडा शर्यत आयोजित केली जात असून रायगड जिल्ह्यातील मुरुड ( Murud) तालुक्यातील नांदगाव येथे काल बैलगाडा शर्यत आयोजित केली गेली होती. या बैलगाडा शर्यतीवेळेस एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.. शर्यत सुरु होताच एक बैलगाडी अचानक प्रेक्षकांच्या मध्ये घुसली त्यामुळे ३ जण जखमी झाले.

हे ही वाचा (Read This) अर्थसंकल्प २०२२ । शेतकऱ्यांसाठी काय फायद्याचं आणि काय तोट्याचं सविस्तर माहिती

रायगडमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन
या बैलगाडा शर्यतीचे आयोजन हे भारतीय जनता पार्टीचे ( BJP) पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त ( Birthday) करण्यात आले होते. या घडलेल्या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ( Video) सध्या सगळीकडे वायरल होतांना दिसत आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *