नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ‘SDRF’ निकषानुसार मदत करणार- वड्डेट्टीवर

Shares

अवकाळी (Untimely) पाऊस गारपीट मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पिकांचे तर नुकसान झालेच होते आता तर रब्बी पिकांचेही अधिक प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी (Farmers) त्रस्त झाला आहे.या अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला, औरंगाबाद, वाशीम, बुलढाणा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी एसडीआरएफ (SDRF) State Disaster Response Fund च्या निकषानुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा ( Read This Also ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान.

“विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांना फटका बसला असल्याचा कृषी व महसूल खात्याचा प्राथमिक अंदाज आहे.तरी लवकरच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल.” असे ट्विट (Tweet ) विजय वड्डेट्टीवर यांनी केले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *