शेतीसाठी जोडधंदा – लखपती बनण्यासाठी करा ससेपालन

Shares

शेतकरी शेती बरोबर कोणता जोडधंदा करता येईल याच्या शोधात सतत असतो. कमी गुंतवणूक करून जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन होय. असेच सस्याचे पालन करून १० लाख व त्याहून अधिक उत्पन्न मिळवता येते. यासाठी साधारणतः चार ते साडॆचार लाखांची गुंतवणूक करावी लागते. ससे पालनाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ससे पालन व यासाठी करावी लागणारी गुंतवणूक –
१. ससे पालन सुरु करण्यासाठी तुम्हाला चार ते साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
२. हा व्यवसाय वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे. एका भागात ७ माद्या ससे तर ३ नर ससे असतात.
३. सश्यांचा पिंजऱ्यासाठी एक ते दीड लाखांपर्यंत तर त्यांच्या चारा साठी एक ते सव्वा लाखपर्यंत खर्च येतो.
४. मादी ससा एका वेळी ६ ते ७ पिलांना जन्म देते.
५. या पिल्लांचा २५ दिवसांचा वाढीचा काळ असतो.
६. एका सश्याचे वजन ४५ दिवसात २ किलो भरते. त्यांनतर ते विक्रीस तयार होतात.
७. एका मादीपासून ५ पिल्ले मिळत असल्याने ४५ दिवसात ३५० पिल्ले मिळतात.
८. पिल्लांची किंमत ४५ दिवसात २ लाखांपर्यंत होते.
९. मादी ससा वर्षातून किमान ७ वेळा पिलांना जन्म देते.
१०. ससे पालन व्यवसायाची तुम्ही फ्रॅन्चाइसी घेऊ शकता.

ससे पालन करून १० व त्याहून अधिक लाखोंचा नफा मिळवता येतो. ससे पालन कारण्यासाठी अनेक जागी प्रशिक्षण देखील दिले जाते.

Shares