बक्कळ पैसे मिळवून देणाऱ्या गाईच्या जाती

Shares

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा उत्तम स्रोत म्हणजे पशुपालन होय. पशुपालनाचा व्यवसाय कमी जागेत देखील करता येतो. पशुपालनातून बक्कळ पैसा कमवता येतो. परंतु कोणत्या पशूचे पालन करावे हे ठरवता आले पाहिजे. अनेक शेतकरी गाई-म्हशीचे पालन करत असतात. गाईंच्या काही जातींचे पालन करून भरगोस उत्पन्न मिळवता येते.
अश्या गाईंच्या जातीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

गाईंच्या महत्वाच्या जाती –
गीर जाती –
१. गीर जातीस गुजराती , सुर्ती , देसन , भदावरी , काठियावाडी म्हणून देखील ओळखले जाते.
२. ही जात गुजरातमधील दक्षिण काठियावाडीतील गीर जंगलात विकसित झाली.
३. गुजरात बरोबर महाराष्ट्र , राजस्थानमध्ये ही जात आढळून येते.
४. या जातीच्या गाईंचा रंग गडद लाल, चॉकलेटी – तपकिरी तसेच पूर्ण कला , पूर्ण लाल असा असतो.
५. या जातीच्या गाईची दूध उत्पादन क्षमता १२०० ते १८०० लिटर पर्यंत असते.

अमृतमहल नस्ल –
१. गाईची ही जात कर्नाटक प्रदेशात आढळून येते.
२. या जातीच्या गाईंचा रंग हा खाकी असून त्यांचे डोके , गाल काळ्या रंगाचे असते.
३. यांच्या नाकपुड्या जास्त रुंद नसतात.
४. यांची दूध उत्पादन क्षमता कमी असते.
५. यांची सरासरी दूध उत्पादन क्षमता ५७२ लिटर पर्यंत असते.

बचोरे जात –
१. या जातीच्या गाईंचे डोळे मोठे , फुगवड असतात.
२. यांचे कपाळ रुंद , सपाट तसेच बहिवर्क असते.
३. या जातीच्या गाईंची शिंगे मध्यम आकाराची तसेच खोडाची असतात.
४. या जातीच्या बैलांची कुबड्या मागे ५८ ते ६२ इंच उंची असते तर हृदयाची उंची ही ६८ ते ७२ इंच इतकी असते.

डांगी जात –
१. या जातीच्या गाई महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेशात आढळतात.
२. या जातीच्या गाई रंगाने काळ्या, पांढऱ्या,लाल असतात.

बारगुर जाती –
१. या जातीच्या गाई तामिळनाडूमध्ये आढळून येतात.
२. या जातीच्या गाईंची दूध उत्पादक क्षमता कमी असते.
३. या जातीच्या गाईंचे डोके लांब तर शेपटी लहान असते.

हरियाणा जाती –
१. या जातीच्या गाई हरियाणा मध्ये आढळून येतात.
२. या जातीच्या गाईंची दूध उत्पादक क्षमता जास्त असते.

कंकरेज जात –
१. या जातीच्या गाई राजस्थानमध्ये आढळून येतात.
२. या जातीच्या गाई दररोज ५ ते १० लिटर पर्यंत दूध देतात.
३. या जातीच्या गाईंचे तोंड रुंद तसेच आकाराने लहान असते.

केनव्हेरिया जाती –
१. या जातीच्या गाई उत्तर प्रदेश , मध्य प्रदेशात आढळून येतात.
२. या जातीच्या गाई आकाराने लहान असून यांचे डोके रुंद असतात.

गावाओ जाती –
१. या जातीच्या गाई महाराष्ट्र , मध्य प्रदेशात आढळून येतात.
२. या जातीपासून साधारणतः दररोज ४७० ते ७२५ लिटर दूध मिळते.

गाईंच्या या जाती महत्वाच्या ठरतात. कोणत्या गाईचे पालन करायचे आहे हे गाईंच्या वैशिष्ट्य वरून सहज ठरवता येते.

Shares