आधुनिक शेतीसह जैविक शेती ही काळाची गरज

Shares

नमस्कार मंडळी,

आपल्या मध्ये शेती कोणत्या पद्धतीने करावी या बाबत आपल्या डोक्यात विचार चालू असतो. तर प्रत्येक हंगामात याबद्दल नेहमी आपल्यापुढे प्रश्न उभा रहातो.

पारंपारीक पद्धतीने करावी का ही शेती पुढे तशीच करावी तसेच जनुकिय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार आधुनिक बियाणे त्याचं बरोबर रासायनिक खतं यांचा उपयोग घेत उत्पादन वाढवावे? हे सर्व जर केले तर उत्पादन वाढण्यासाठी लागणारा पैसाचा खर्च वाढतो आहे. तो कमी कसा करायचा? नवनवीन वाढणारे किडीचे प्रमाण रोखायचे कसे? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे रहाते आहेत तर दुसर्या बाजुने नैसर्गिक आपत्तीत धोके लक्षात घेऊन शेती व माती चे संगोपन करण्यासाठी जैविक पद्धतीची शेती केली पाहिजे.

हे ही वाचा (Read This) जमिनीची कस म्हणजे तिचा कर्ब

परंतु आपल्या शेतातून माती वाहून जाण्याचे प्रमाण भरपुर आहे. अशा जमिनीतून जैविक सामग्री मुळातच कमी होत असल्यामुळे त्याच बरोबर म्हणून खतांचा योग्य उपयोग होत नाही जमिनीचे पोषणही योग्य होत नाही व त्यांत आद्रता आवश्यक पातळीवर टिकून राहत नाही.

हे ही वाचा (Read This) गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी होणारे फायदे

नवनवीन निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या या आपल्या शेतीची गुणवत्ता जास्त वाढविण्याचे काम आपण करतंच नाही. त्यामध्ये नविन प्रयोग करण्याचे प्रयत्न मुळातच कमी झाल्यामुळे आपला शेतकरी हा जास्त उत्पादन पासूनही दूरच राहिलेला आहे.म्हणण्याचे तात्पर्य हेच कि शेती व शेतकरी या मध्ये मेळ बसत नाही .

आता प्रत्येक शेतकरी मित्राला आपल्या गावच्या परिसराची व शेती ची जास्त चांगली जाणीव असते. त्याच्याजवळ मागील वाडवडीला पासुन शेती चा दांडगा अनुभवा व ज्ञान देखील असते. परंतु आता शेतीमध्ये काही समस्या आल्यास उपाय शोधताना एक-एकट्या शेतकऱ्याचा विचार करण्याला मर्यादा असते.

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !

याउलट शेतकऱ्यांचा गट जेव्हा एकत्रितपणे विचार करतो तेव्हा बऱ्याच जणांची डोके एकत्र काम करून शेती व इतर समस्येची उकल होण्यास मदत होते. त्याच गावातील नाही तर आजुबाजुच्या गावातील इतर गावातील प्रयोगशील व नविन पद्धतीची आधुनिक शेती शेतकऱ्यांच्या अनुभवांची मदतदेखील या प्रक्रियेत होऊ शकते.

यासाठी गावातील काही शेतकऱ्यांनी महिन्यातून एक दोन वेळा तरी असा शेती बद्दल असलेल्या समस्यांचा विचार करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. तशेच काही चांगल्या सूचना शेतकऱ्यांनी स्वतःहून दिल्या.

हे ही वाचा (Read This) आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!

शेतीची वाटचाल योग्य दिशेने यशस्वी होण्यास मदत होईल.आपल्या शेतीची आजची अवस्था खुप बिकट आहे. ती शेतकऱ्यांचा जगण्याचा पूर्ण आधार होऊच शकत नाही. त्यासाठी शेतीव्यवस्थेत व बाजारव्यवस्थेत जसा आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे तसेच शेतीला गावपातळीवर पूरक व्यवसायांची जोड देणेही तेवढेच गरजेचे आहे.

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
Mission agriculture soil information

मिलिंद जिनदासराव गोदे
9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *