दुधाच्या दरात वाढ मात्र शेतकरी अजूनही संकटात ?

Shares

शेती बरोबर तर मुख्य व्यवसाय म्हणून अनेक जण दुग्ध व्यवसाय करतात. परंतु मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे दुधाच्या मागणीत घट झाली असतांना देखील दरात वाढ झाली नव्हती. त्यात पशुखाद्याच्या दरात मात्र वाढ होत होती. तरीही दुग्ध व्यवसाय कारण्याऱ्यांनी आपला व्यवसाय आतापर्यंत टिकून ठेवला. आता याचे फळ मिळतांना दिसून येत आहे. २ वर्षानंतर का होईना आता दुधाच्या दरात २ रुपायांनीं वाढ झाली आहे.

ही वाचा (Read This ) सरकारचा तेलबियांच्या साठ्यावर कडक निर्बंध, परिणाम सोयाबीनच्या दरावर ?

पशुखाद्याचे आणि दुधाचे दर कसे आहेत ?
मागील ५ महिन्यांपासून पशु खाद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली असून कळण्याचे ५० किलोचे पोते ६०० वरून १००० तर मक्यापासून बनवली जाणारी कांडी १००० वरून १४०० , सरकी ६०० वरून १००० खापरी पेंडीचे दर तर २७०० वर गेले आहे.

दुधाच्या दरात २ रुपायांनीं वाढ झाली असून दूध पावडर चे दर १८० रुपयांवरून २७० रुपये किलो तर
लोणीपासून तयार होणाऱ्या बटर चे दर २४० वरून ३५० रुपये किलो वर पोचले आहे. यामुळे गाईंच्या दरात देखील वाढ झाली आहे.

ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

दुधाचे दर वाढूनही शेतकरी प्रश्नात …
एकीकडे आता दुधाचे दर आता २ रुपायांनीं वाढले असले तरी हे दर २ वर्षांनी वाढले आहे तर दुसरीकडे महिन्याकाठी पशुखाद्याचे दर वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही दरामधील दरी कशी भरावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *