सोयाबीनला मिळाला आतापर्यंतचा उच्चांकी दर, लवकरच ८ हजार पार करणार !

Shares

सोयाबीनच्या दराची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु होती.या चर्चेचे कारण म्हणजे सोयाबीनला कधी कवडीमोल दर तर कधी साठवणूक जास्त आवक कमी अशी परिस्थिती होती. सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. आता सोयाबीनला ७ हजार ३०० रुपये असा दर मिळत आहे.

सोयाबीनला सुरुवातीला अगदी कवडीमोल भाव होता त्यानंतर तो ६ हजारांवर येऊन स्थिर झाला होता. आता मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होतांना दिसत आहे. काल सोयाबीनला ७ हजार असा भाव मिळाला होता. तर आता २४ तासांतच हा भाव ७ हजारांवरून ७ हजार ३०० वर गेला आहे.

ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

दरात वाढ होताच आवक देखील वाढली

सोयाबीनच्या दरात आता कमालीची वाढ झाली आहे. सोयाबीन थेट ७ हजार ३०० वर पोचले आहे. तर जिथे सोयाबीनच्या १८ ते २० पोत्यांची आवक होत होती तिथे आता थेट ३० पोत्यांची आवक होत आहे. भविष्यात दरात अजून वाढ होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीनची विक्री करतील कि साठवणूक हे बघण्यासारखे आहे.

शेतकऱ्यांचा निर्णय ठरला फायद्याचा

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता साठवणूक करून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा अधिक प्रमाणात फायदा होत आहे.सध्या समाधानकारक दर असल्याने आता साठवणूकीतले सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहे त्यामुळे सोयाबीनच्या आवक मध्ये वाढ झाली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *