शेती आणि सण, बळीराजाची ‘होळी’ !

Shares

नमस्कार शेतकरी,

शेतकरी बांधवांना सर्व प्रथम होळीच्या शुभेच्छा आपला भारतीय शेतकरी (Indian Farmer) हा निसर्गपुजक आहे त्यामध्ये होळी (Holi) या सनाला (Indian Festival) हंगामात आलेल्या पिका बद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो.

प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची होळीची पुजा करतात. महत्वाचे म्हणजे होळी चे दहन झाल्यावर जी राख शिल्लक राहते ती राख शेतकरी आपल्या बि बियाणे मध्ये टाकत असतो. त्या मागचे उद्दीष्ट की त्या बियाण्यास कीड लागत नव्हते.

भारतीय शेती ही संस्कृतीशी (Agriculture Culture) जुळली होती मराठी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून शेतकरी आनंद उत्सव साजरा (Festival Celebration) करतात. शेतकऱ्यांसाठी होळीचा सण हा महत्त्वाचा होता आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण हा शेतकरी नापिकी,अस्मानी सुलतानी संकट, वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !

आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा सण आहे. ही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.

आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामिण भागातले नागरिक स्वताचे शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणा पासून बघत आहे. होळीच्या म्हणजे शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमी सण साजरा केला जातो , या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करतात विशेतः तरुण वर्ग व शेतकरी वर्ग हा सण उत्सहाने साजरा करतात , सर्वानी एकत्र येणे , बंधुभाव आणि एकतेने आनंद साजरा करणे हाच या मागचा उद्धेश असतों.हा
सण फाल्गुन महिन्यात येणार असल्याने सर्व शेतीची कामे संपलेली असतात.

शेतकरी याचा हा निवांत काळ असतो त्यामुळे हा सण साजरा होतो , होळी या सणाची भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धी आहे .आपण जेव्हा हरवलेल्या शेती संस्कृतीचा व सणाचा विचार करतो तेव्हा कधी लक्षात येते की, आपली पारंपरिक शेती आणि सेंद्रिय खतांचा व सुगंध ह्या गोष्टीचा ग्रामीण भागामधून केव्हा कमी झाला हे आपल्याला समजलेच नाही.

आपण वर्तमानात हरवलेल्या नद्या, जलस्रोत, उजाड जंगले आणि शेती सभोवतालच्या नष्ट झालेल्या जैव विविधता शेतकर्‍यांशी जुळलेली कृषी संस्कृती आणि तिला जोडलेले सण, वार, उत्सव ह्यांचे मजबूत धागे आज आधुनिकतेच्या ओघात कमी झाले आहे. त्यामधला एक जरी धागा जुळला तर आपल्या बळीराजाच्या या सणाला आनंदाच्या रंगोत्सवची रंगत पुन्हा त्यांच्या जिवनात चांगली येऊ शकते.आज शेतकरी वाचला तर आपली सण उत्सव व कृषी संकृती वाचेल.

धन्यवाद मित्रांनो.

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *