या पिकाची लागवड करून मिळवा १० वर्षापर्यंत भरघोस नफा

Shares


अनेक शेतकरी हे पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोरोना काळानंतर तर औषधी वनस्पतींकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढत आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळतांना दिसत आहे. याचे कारण म्हणजे सुगंधी फुलांना वर्षभर मागणी असते तर कोणताच सण हा फुलांशिवाय पूर्ण होत नाही.
मोगरा हे मूळचे भारतीय असून भारतातून इतर देशात याचा विस्तार झाला.

हे ही वाचा (Read This)  भारतीय गव्हाला जगात वाढली मागणी, एकूण 1 दशलक्ष टन गहू निर्यात, गव्हाला अजून चांगला दर मिळणार ?

अनेक फुलशेती करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुले निर्यात करून अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. फुलशेती करायची असेल तर यामध्ये एक उत्तम पर्याय म्हणजे मोगरा फुलाची शेती. मोगरा फुलाची बाग तयार केली की १० वर्षापर्यंत याचे पीक घेता येते. तर या शेतीसाठी पाणी देखील जास्त लागत नाही. तसेच जनावरांकडून पीक नासाडीची धास्ती नसते. मोगर्‍याचे झाड साधारणतः 10 ते 15 फूट वाढते. वेलीसारखे असणारे मोगर्‍याच्या झाडाचे कालांतराने झुडपांमध्ये विस्तार होतो.

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

लागवड माहिती

  • मोगरा पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा करणारी मुरमाड जमीन योग्य ठरते.
  • गर्‍याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य ठरते.
  • मोगऱ्याची लागवड ही नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून-जुलै महिन्यामध्ये केली जाते.
  • प्रति एकर प्रमाणे मोगऱ्याची ४ हजार ५०० रोपे लागतात.
  • मोगर्‍याची वाढलेली लांब फांदी वाकवून ती दुसर्‍या ठिकाणी पुरतात व नवीन रोपे तयार करतात.
  • नवीन पाने ज्या ठिकाणी येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर त्याच्या नोडपासून खाली मुळे फुटतात.
  • यांच्या २ रोपांतील अंतर हे २ फूट ठेवावे.
  • मोगर्‍याच्या शेतीसाठी जमीन मशागत करताना एक एकरसाठी ८ टन शेणखत, २०० किलो एसएसपी खत, २०० किलो निम पेंडल व १२५ किलो करंज पेंडल खत घालावे.
  • मोगरा फुलांची तोडणी ही सकाळी ७.३० ते १०.३० यांच्या दरम्यान करावी लागते. त्यांनतर त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून त्यास बाजारामध्ये पाठवावे लागते.

मोगऱ्याच्या प्रजाती

  • मदन मान
  • मोतिया
  • बेला
  • बटमोगरा

उत्पादन

  • मोगराच्या प्रति एकर प्रमाणे दररोज किमान २५ कळ्या मिळतात.
  • मोगऱ्याचे महिन्यामध्ये ६ टन उत्पादन मिळते.

हे ही वाचा (Read This) PM Kisan Scheme: आता आधारशिवाय पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, नियम झाले कडक

मोगर्‍याची शेती हा फूलशेतीत शेतकर्‍यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एकदा केली की, सलग १० वर्षे उत्पादन घेता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. तसेच जनावरांपासून यास धोका नसतो. तर यास बाराही महिने मागणी असून यास चांगला भाव मिळतो.

हेही वाचा :- किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *