मातिची सुपिकता हा विषय आज चिंतनाचा – एकदा वाचाच

Shares

मिलिंद जि गोदे – नमस्कार मंडळी वाचाल तर वाचाल आपन सर्वांना माहीत असेल की क शेतकर्यांची उत्पादना बाबत परीस्थिती खुप हालाकिची आहे कि दोन तीन वर्षापासून काही भागात सोयाबीन व तुर कमी होत आहे, त्या वरचे व्हायरस कंट्रोल होतच नाहीं कितीही भारी किटकनाशके,माॅलिक्युल मारा, काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातून मुग,उळीद चा विषयच संपलाच मुख हे पिक रोगामुळे जात असते तर कुठल्यातरी औषधाने ठिक झालेच असते, मुळ समस्या पिकाची नाहीं, मातीची आहे, तिचा कस सेंद्रिय कर्ब कमी झाला. बरं साधारणपणे किती कमी झाला असेल थोड़ी माहीती पाहुयात सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% घ्या आसपास असतो, आमच्या कृषी विद्यापीठ यांच्या माहीतीनुसार तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो तर मग आपल्या जमिनीचा कर्ब कमीतकमी यापेक्षा जास्तच असायला हवा ना पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, कि एरीगेशन मधे जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन आणि आजचा शेतकरी पिकवण्याची कसरत करत आहे.

देशात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण

भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय परिणामी कुपोषित गायच्या पोटी अशक्त व अपंग वासरूच जन्माला येईल, तशी परिस्थिती आपल्या मातीची आहे.त्याप्रमाने कोणतेहि पिक लावा, रोग त्याच्या पाचविला पुजलेला असतो. रोग कमी यावे व अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता शेतकरी हायटेक टेक्नॉलॉजी वापरतात, मल्चिंग करतात, शेडनेट, पाँलिहाऊस करतात माझे ह्या हाईटेक शेतीला दुमत नाही पण होते काय ? शेतकऱ्यांचे कर्जदेखील फिटत नाहीं. मग शेतकऱ्यांचे हाल विचारायलाच नकोत…. एक वर्ष पिक चांगले येते, मग पुढचे काही वर्ष त्याचे झालेले पैसे पुन्हा त्यातच खर्च करायचे व पुन्हा पहिल्यासारखे उत्पन्न निघण्याची वाट पहायची, हे दुष्ट चक्र चालूच रहाते.

येत्या काळात पीठ, तांदूळ आणि तेल स्वस्त होणार! या पिकांच्या क्षेत्रात बंपर वाढ

हेच उदाहरण घ्या…., विदर्भात सोयाबिन चे निरुपयोगी, बेभरवशाचे पिक आपण करु लागलो, चार-पाच वर्षांपर्यत केवळ पेरले कि पावसाच्या पाण्यावर काहीही न करता येत होते पण आजची परिस्थिती पहा, सोयाबिनला भारीच्या भारी किटकनाशके मारायची वेळ आली. कुठे चाललाय शेतकऱ्यांचा खर्च…. कशी परवडणार असी शेती? मला असे वाटते कि, विचार करा समस्या नीट समजून घेणे गरजेचे आहे …. मुख्य उपाय मातीच्या व पिकाच्या पोषणावर करणे गरजेचे आहे, मग दुय्यम उपाय रोगांसाठी करायला हवे. पण होते ते उलटेच. पावसाळी वातावरणात किंवा प्रतिकूल वातावरणात पिकांचे पोषण अत्यल्प होते किंवा थांबते.

तर शेतकरी आत्महत्या नाही करणार

“पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते .परिणामी प्रतिकारशक्ति कमी होते, पिकं पिवळी पडून विविध रोगांना बळी पडतात. शेतकरी किडी व रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी खूप खर्च करताना दिसतात पण, ह्या समस्येची तिव्रता अन्नद्रव्यांची कमतरता मुळे वाढत आहे,हे त्यांच्या लक्षात येत नाहीं. किडी व रोगावर औषधे मारण्याबरोबर पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवणे त्याहून महत्त्वपूर्ण आहे . अन्यथा शेतकरी किडी व रोगावर औषधे मारत रहातो व पिक कमजोर पडत जाते. हे असे होते कि आपण आपला रोग तर बरा करतोच आहे, पण सलाईनच बंद पडले, मग पूर्णपणे शरीरावर अशक्त पणा जाणवतो एक दिवस पिक कायमचे सोडून द्यावे लागते.

बाजरी 2023: जगातील सर्वात जुने पीक अजूनही मजबूत उत्पन्नाचे स्त्रोत आहे, जाणून घ्या काय आहे बाजरीमध्ये विशेष

अगदी १०/१५वर्षांपूर्वी तर एवढे रोग नव्हते,मुग व उळीद इत्यादी पिके कोणतीही विशेष काळजी न घेता आजच्यापेक्षा छान पिकायच असे काय होते जमिनीत त्या वेळी जे आज नाहीं ? हे मान्य करावे लागेल व चिंतन करण्या सारखा गंभीर प्रश्न आहे. जमिनीचा कस म्हणजे ” सेंद्रिय कर्ब “ होय ….

धन्यवाद

मिलिंद जि गोदे

सेंद्रिय शेती अभ्यासक

milindgode111@gmail.com

विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

Save the soil all together

कुक्कुटपालन : कोंबडी अंडी घालायला लागते म्हणून खाद्य कधी आणि किती घालावे, कोंबडीकडून अंडी घेण्याचा फंडाही जाणून घ्या!

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, HRA वर मोठी अपडेट

आता मध व्यवसायात तोटा होणार नाही, शास्त्रज्ञांनी लावला मधमाशांचे संरक्षणात्मक आवरण, वाचा सविस्तर

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *