सोयाबीनच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Shares

खरीप हंगामातील पिके आता अंतिम टप्यात असले तरी सोयाबीनची चर्चा ही अजूनही सुरु आहे याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची साठवणूक.

मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ३५० वर स्थिरावले होते. मात्र आता सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम आता आवक वर होतांना दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवतोय, दरात मोठी घट जाणून घ्या आजचे दर

लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १८ ते २० हजार पोत्यांची आवक सुरु होती. बऱ्याच प्रमाणात सोयाबीनची विक्री झाली असली तरी अजूनही काही प्रमाणात सोयाबीन साठवणूक करून ठेवलेला असून शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीन काढून अनेक अपेक्षा आहेत.

सोयाबीनचे आजचे दर

soybean price

सोयाबीनच्या दरात १०० रुपयांची घसरण

सोयाबीनची आवक ही सरासरी पेक्षा कमी होत असली तरी दराचे काय? शेतकरी सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या बाबतीत सावध भूमिका घेत आहेत. तरीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर ७ हजार ३५० वरून ७ हजार २५० वर येऊन थांबले आहे.
तर दुसरीकडे हरभऱ्याची काढणी झाली की लगेचच विक्री शेतकरी करत आहेत.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री

मागील काही दिवसांपासून बाजारपेठेमध्ये हरभऱ्याची विक्री केली जात होती. मात्र आता बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरामध्ये काहीही बदल होत नसल्यामुळे तसेच खरेदी केंद्रावर अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करत आहेत.

तसेच खरेदी केंद्र हे गावाजवळ असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी लागत आहे.

हमीभावापेक्षा तुरीला जास्त दर

खरीप हंगामातील तुरीची आवक ही आता सुरु झाली आहे. तर मागील ४ दिवसापासून तुरीच्या दरात वाढ झाली आहे.

खरेदी केंद्रावर ६ हजार ३०० दर ठरवून दिला आहे मात्र लातूर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये तुरीला ६ हजार ६५० असा दर मिळाला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *