उस गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करता येणार नाही- आयुक्त

Shares

जो पर्यंत संपूर्ण ऊस गाळप होत नाही तोपर्यंत साखर कारखाने बंद करता येणार नाही असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न उध्दभवला आहे.राज्यातील इतर जिल्हा प्रमाणेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडील ऊस या हंगामात साखर कारखान्यांपर्यंत पोहोचेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या दोन वर्षापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी साठ्याचे सोर्स वाढले आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये उसाची लागवड मराठवाड्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ही वाचा (Read This) सोयाबीन आणि तुरीच्या दरात दिलासादायक वाढ !

तांत्रिक अडचणींमुळे उशिरा उघडले साखरकारखाने
तांत्रिक अडचणींमुळे बरेच साखर कारखाने हे खूप उशिरा सुरू झाले. त्यामुळेच त्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस साखर कारखान्यापर्यंत गाळप बंद होईपर्यंत पोहोचेल का अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. किमान शिल्लक राहिलेल्या उसाची माहिती घेऊन संबंधित साखर कारखान्याला प्रशासनाने कळवले तर कदाचित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचवता येऊ शकते.

ही वाचा (Read This) हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन

पत्रात काय म्हंटले आहे ..
शासनाच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्व प्रकारच्या साखर कारखान्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या उसाचे काळात झाल्याशिवाय बंद करता येणार नाही..गाळप हंगाम बंद होण्याच्या पंधरा दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर प्रगटन द्यावे
विनापरवानगी कारखाना बंद केल्यास आणि कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाविना शिल्लक राहिला तर त्याची जबाबदारी ही साखर कारखान्यावर असेल आणि त्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा साखर आयुक्तांनी दिला आहे.प्राथमिक अंदाजानुसार एकूण 12.32 लाख हेक्‍टर क्षेत्रावरील चालू हंगामात उस उपलब्ध आहे. उस उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी.

ही वाचा (Read This) कांद्याची आवक वाढूनही दर स्थिरावले

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *