शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; राज्य सरकार वीज कनेक्शन कापणार नाही, कापलेली वीज पूर्वरत जोडणार

Shares

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे .

नितीन राऊत विधानसभेत म्हणाले कि ज्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाची वीज तोडले आहेत त्यांचा वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात येईल. जोपर्यंत पुढचे पीक निघत नाही तोपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही असं राऊत यांनी विधानसभेत सांगितले . या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते.

ज्या शेतकऱ्यांची वीज तोडली आहे अशा शेतकऱ्यांचे कनेक्शन परत जोडणी करण्याचा निर्णय आज पासून सुरुवात करणार असल्याच त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पीक येईपर्यंत पुढील ३ महिन्यानापर्यंत आम्ही वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत, असे राऊत म्हणाले.

हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये

शेतकरी आक्रमक

वीज तोडणी केल्यामुळे विविध शेतकरी संघटनेने तसेच शेतकऱ्यांनी सरकार विरोधात अनेक आंदोलने केली. एवढेच काय अनेक शेतकरी तर आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.

त्वरित वीज तोडणी थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. तर दिवस १० तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर आत असहकार यावर काय निर्णय घेईल हे पाहण्यासारखे आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

मागील आश्वासन अजूनही पूर्ण केलेले नाही

राज्य सरकारने मागच्या अधिवेशनात दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण केलेले नाही. असे फडणवीस म्हणाले. सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहेत. मागील अधिवेशनात असे सांगितले होते की, मे महिन्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोडणी करण्यात येणार नाही. मात्र तरीही अनेकांची वीज खंडित करण्यात आली होती.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *