नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात १% ते ३% सवलत

Shares

पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरु केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख ( Dr. punjabrao Deshmukh ) व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली . जे शेतकरी (Farmer )कर्जाची नियमित परतफेड करतात अश्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. या योजनेअंतर्गत १ ते ३ लाखांपर्यंतच्या कर्जाची निर्धारित मुदतीत परतफेड केल्यास आताचा १% व्याजदरात अजून २% व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा (Read This Also ) “मागेल त्याला शेततळे” योजना संपूर्ण माहिती.

शेतकऱ्यांना व्याज सवलत (concession to farmers )
शेतकऱ्यांना राज्य तसेच केंद्र सरकारकडून ३ % व्याज सवलत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळाला. या वर्षी १७ हजार ६२४ शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाख व्याज सवलत देण्यात आले असून मागील ५ वर्षात एकूण १ लाख ३५ हजार ८९६ शेतकऱ्यांना १८ कोटी ४७ लाख ९६ हजार रुपयांची व्याज सवलत देण्यात आली . प्रत्येक वर्षी व्यापारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक यांच्याकडून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी ६ % व्याजदराने कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड करावी तसेच त्यांची पत वाढावी यासाठी शासनाकडून १ टक्क्याची व्याज सवलत देण्यात येते.
मात्र या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासनाने यात अजून २ % व्याज सवलत दिल्यामुळे केंद्र सरकारकडून ३ % तर राज्य सरकारकडून ३ % असे मिळून ६ % व्याज सरकारकडून दिले जात असून यामुळे शेतकऱ्यांना ० % व्याज दराने कर्जपुरवठा वयास मदत मिळाली.
ही योजना केवळ मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *