अतिवृष्टीची नुकसान भरपाई पूर्ण होण्यापूर्वीच अवकाळी पावसाचे पंचनामे !

Shares

निसर्गापुढे कोणाचे काहीही चालत नाही. मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबरोबर प्रशासनाला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यात २ दिवसांपूर्वी औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे फळबागायती बरोबर रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाला अधिकच खर्च लागणार आहे.

कृषी , महसूल विभागाला दिल्या पंचनाम्याच्या सूचना
अवकाळी पाऊस , गारपीठ मुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, पाचोड, वैजापूर या भागात पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. महसूल तसेच विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी गोदावरी काठच्या गाव शिवारात पाऊस , गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी केली आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्रीने मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. याबरोबर लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे अशी सूचना कृषी , महसूल विभागाला देण्यात आले आहे. कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फेरे मारण्यास सुरु केले आहे.

पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे. हे ही वाचा .

मराठवाड्याला बसला अवकाळीचा फटका
अवकाळी पाऊस , गारपिटीचा मोठा फटका मराठवाड्यातील औरंगाबाद सोबतच , नांदेड , बीड जिल्ह्यास बसला असून गहू, हरभरा, कांडा, द्राक्ष, शेवगा, डाळिंब पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. रब्बी पिकांचा पेरा होऊन काहीच दिवस झाले होते. पिके बहरात होती तसेच पिकास पोषक वातावरण असून मुबलक पाणी देखील उपलब्ध होते. रब्बी पिकांकाढून शेतकऱ्यांची खूप अपेक्षा होती मात्र त्यावर आता अवकाळी पाऊस ने पाणी फेरले आहे.

पीक नुकसान भरपाई
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही पूर्ण झालेली नव्हती अश्यात अवकाळीमुळे पुन्हा नुकसान भरपाईचे संकट शासनापुढे उध्दभवले आहे. पीक नुकसान भरपाई ही महसूल विभागाने अहवाल सादर केल्यानंतर केली जाते. या अहवालानुसार राज्य सरकारने ७२४ कोटी तर केंद्र सरकारने ८९९ कोटी रुएए शेतकऱ्यांना अदा केले असून आता परत पंचनाम्यास सुरुवात केली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *