शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,१ जानेवारी पासून तूर खरेदी केंद्र सुरु.

Shares

महिन्याभरापूर्वीच खरीप हंगामामधील नवीन तूर बाजारात आली आहे. या महिन्याभरात व्यापाऱ्यांनी एकदाही ठरलेल्या हमीभावामध्ये तूर खरेदी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्र उघडण्याची वाट बघत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून २ दिवसानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तुरीच्या दरात व्यापाऱ्यांनी वाढ केली असून गुरुवारी लातूर कृषी (Agriculture) उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला असून अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी गोंधळला आहे. कारण सोयाबीनचा अजूनही दर ६ हजार ४०० वर स्थिर आहे.

आतापर्यँतचं तूर दर
बाजारपेठेत डिसेंबरच्या सुरवातीपासूनच तुरीची आवक सुरु झाली असून हंगामाच्या सुरुवातीला तुरीस ५ हजार ८०० दर मिळत होता. बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या पिकावर वाईट परिणाम झाला असून शेंगा पोसल्याच गेलेल्या नाहीत. त्यामुळे तूर दर कमी झाले होते. परंतु आता २ दिवसापूर्वीपासून तुरीला चांगला दर मिळत आहे. पांढऱ्या तुरीला ६ हजार ३३० तर तुरीला ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

हे ही वाचा ( Read This Also ) काय आहे चंदन कन्या योजना ?

१ जानेवारी २०२१ पासून १८६ खरेदी केंद्र सुरु होणार आहे
केंद्र सरकारने तुरीचा ६ हजार ३०० रुपये भाव जरी ठरवला असला तरी अजूनही केंद्रे बंद असल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना तुरीची विक्री करत आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना जास्त प्रतीक्षा नाही करावी लागणार १ जानेवारी २०२२ पासून राज्यातील १८६ केंद्रे सुरु होणार आहेत. त्यामुळे तुरीस कमीतकमी ६ हजार ३०० रुपये दर तरी मिळेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तूर खरेदीसाठीची गरजेची असणारी नोंदणी प्रक्रिया खरेदी केंद्रावर सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
आधारकार्ड
सातबारा
८ अ
पीक पेऱ्याची नोंदणी पत्र

खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *