कर्जामुळे शेतकरी नवरा बायकोने घेतले विष, करता नवरा दगावला

Shares

दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याच्या घटना वाढतांना दिसत असून वर्धामध्ये कर्जबाजारीपणाला त्रासून एका पती पत्नीने विष घेतले असता पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीची प्रकृती आता ठीक आहे. अर्चना राजेंद्र चरडे आणि यांचे पती राजेंद्र चरडे यांनी ९ जानेवारीला संध्याकाळी राहत्या घरी विष पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर आता पत्नीस सुट्टी दिली आहे.

ही वाचा (Read This) सोयाबीन आणि तुरीच्या दरात दिलासादायक वाढ !

आता दोन मुलींचा सांभाळ कसा करणार ?
राजेंद्र यांच्याकडे फक्त २ एकर शेती असून दोन लहान मुली असल्याची माहिती मृतक शेतकऱ्याची पत्नी अर्चना राजेंद्र चरडे यांनी दिली आहे. राजेंद्र यांच्यावर सेवाग्राम येथील सेंट्रल बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज होते. सोबतच त्यांनी इतर लोकांकडून कर्ज घेतल्याची माहिती आहे. तर पत्नी हिच्या नावाने सुद्धा उमेदच्या गटातून कर्ज काढलेले आहे. शेतीतून होणारे उत्पन्न आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून राजेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती मृतकाचा भाऊ नरेश चरडे यांनी दिली आहे.

ही वाचा (Read This) हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन

सरकाने ठोस पाऊले उचलण्याची गरज …
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. परंतु या योजनाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळताना दिसत नाही. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली जातं आहे. शेतकरी आत्महत्या होतात. पण, सरकारी निकष पूर्ण करणं बरेचदा कठीण जातं. कागदपत्रांच्या अभावी काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचं चित्र आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेऊन ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.

ही वाचा (Read This) कांद्याची आवक वाढूनही दर स्थिरावले

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *