नंदुरबारमध्ये मिरचीची आवक वाढली, २०० एकरात वाळवली मिरची !

Shares

काळानुसार पिकांच्या वाणात बदल होते तर अनेक नवीन सुधारित वाणांची लागवड केली जाते. नंदुरबारमध्ये मिरचीच्या नवीन वाणाची लागवड केली असून पारंपरिक मिरचीची जागा या तेजा मिरचीने घेतली आहे. देशातील चौथ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ नंदुरबार ( Nandurbar Chilly Market ) ही आहे. परराज्यातून तसेच जिल्हाभरातून मिरचीची आवक वाढत चालली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच मिरचीला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे मिरचीच्या आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार (Market ) समितीच्या जवळ चक्क २०० एकरमध्ये लाल मिरची (Red Chilly ) वाळवण्यासाठी पसरवण्यात आली आहे. याच परिसरामध्ये मिरची खुडण्याचे काम देखील सुरु आहे.

तेजी मिरचीने घेतली पारंपरिक मिरचीची जागा
नंदुरबार मध्ये शंकेश्वरी मिरचीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जात होते. परंतु आता यामध्ये बदल झाला असून तेजा मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. आता पर्यन्त नंदुरबार बाजारपेठेत १ लाख ५० हजार क्विंटल मिरचीची आवक झाली असून दिवेसंदिवस यामध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. नंदुरबारमध्ये तेजा मिरची बरोबर कळस, लाली, अरुणीम , व्हीएनआर मिरचीही देखील लागवड केली जाते.

हे ही वाचा (Read This Also ) एका एकरात चक्क १५ लाखांचे उत्पन्न !

मिरचीला मिळत आहे सर्वाधिक दर
नंदुरबार बरोबर गुजरात तसेच इतर राज्यातदेखील मिरचीची आवक सुरु असून लाल मिरचीला प्रति क्विंटल प्रमाणे ३ हजार ५०० पेक्षा अधिक दर मिळत आहे. या भागातील मिरची चव, रंग , गंध यांसाठी प्रसिद्धीत आली आहे. येथील मिरचीची प्रत देखील उत्तम असून आवक वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच मिरचीला चांगला दर असून एकदाही मिरचीच्या दरात घट झालेली नाही. तब्बल २० दिवसांपासून मिरची वाळतांना दिसत असून शेतकरी नंदुरबार बाजारपेठेकडे आकर्षित होत आहेत.

मजुरांना देखील मिळाले काम
बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक सुरु आहे तर हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात सुकवली जात आहे. त्याचबरोबर मिरची खुडण्याचे काम देखील जोरदार सुरु आहे. एक महिला दिवसाला साधारणतः २०० किलो मिरच्या खुडते तर ४० किलो मिरचीचे देठ खुडल्यानंतर ६० रुपये मजुरी मिळत आहे. त्यामुळे मजुरांना चांगले काम मिळाले असल्यामुळे मजूरदेखील खुश आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *