हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन

Shares

सर्वांच्या लाडक्या फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे बाजारात आगमन (Mango Arrival) झाले आहे. यंदा सर्वच फळांना अनेक संकटांचा सामना करावा लागला असून अनेक अडचणींवर मात करून कोकणातील हापूस आंब्याने ( Hapus Mango) बाजारात एन्ट्री केली आहे. आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सोबत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातील आंबे पाहण्यास मिळत आहे.
नागरिक हापूस आंब्याच्या प्रतीक्षेत नेहमी असतात तर यंदा बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या चाहत्यांना आता आपल्याला मनसोक्त आंबा चाखता येणार की नाही असा प्रश्न पडला होता. मात्र आता सगळ्यांची प्रतिक्षेला पूर्णविराम लागला असून हापूस आंब्याने बाजारात जोरदार एंट्री केली आहे.

ही वाचा (Read This ) इसबगोल : रब्बीत भरगोस उत्पन्न मिळवून देणारे पीक !

प्रति आंबा ६७६ रुपये …
वातावरणात होणाऱ्या संताच्या बदलाचा परिणाम आंब्याच्या दरावर दिसून येत असून यंदा आंब्याचे आगमन जरा उशिरा झाले आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ डझन च्या पेटीस चक्क ४० हजार ५९९ दर मिळत आहे. तर एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला ६७६ रुपये मोजावे लागत आहे. मागील वर्षी एका आंब्याचा दर हा ६२५ असा होता. यंदा उत्पादनात थोडी घट झाल्यामुळे आंब्याचे दर हे असेच राहतील तर दर अजून वाढण्याची शक्यता आहे.

ही वाचा (Read This ) पशुपालन करणाऱ्यांना सरकार यासाठी देणार ७५ टक्के अनुदान

जून पर्यंत चाखता येणार आंबा
हंगामाच्या सुरुवातीसच मुंबईमध्ये आंब्याची आवक सुरु झाली होती. मुंबई मधील वातावरण आंबा पिकवण्यासाठी पोषक ठरतो. त्यामुळे ४ ते ५ दिवसाअगोदरच आंबा बाजरात दाखल झाला होता. परंतु कोल्हापूरमध्ये आताच आंब्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे जुनेपर्यंत आपल्याला आंबा बाजारात पाहण्यास मिळणार असल्यामुळे आंब्यांच्या चाहत्यांना यंदा जास्त दिवस आंबा चाखता येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *