दुधाच्या ह्या ७ पदार्थापासून मिळवा नफाच नफा

Shares

कच्च्या दुधापेक्षा त्या पासून बनवलेल्या पदार्थाना मागणी तर आहेच पण त्याच बरोबर त्यांची साठवून ठेवण्याची क्षमता देखील जास्त आहे.दुधापासून बनवलेल्या पदार्थाचे कमी उत्पादन होत असल्याने माफक किमतीमध्ये ग्राहकांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो. दुधापासून बनवलेल्या कोणत्या पदार्थांना जास्त संख्येने मागणी आहे हे आपण जाणून घेऊयात.
पनीर –
१. भारतामध्ये पनीरला मोठ्या संख्येने मागणी आहे.
२. हॉटेल व्यवसायामध्ये पनीरपासून बनवलेल्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे .
३. घरी पनीरचे वेगवेगळे पदार्थ हमखास बनवले जातात.

लोणी –
१. दुधापासून सर्वात जास्त बनवला जाणारा पदार्थ म्हणजे लोणी.
२. लोणी हे आरोग्यवर्धक आहे.
३. कमी कोलेस्ट्रॉल असलेले विविध प्रकारचे लोणी आपल्याला बाजारात दिसून येते.
४. लोणी उत्पादन कमी गुंतवणून करून छोट्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता .

तूप –
१. सोपे मशीन आणि कमी उपकरणाचा वापर करून तुपाचे उत्पादन करू शकतो.
२. अगदी घरी सुद्धा तुपाचे उत्पादन घेऊ शकतो.
३. तूप उत्पादनासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते.

लस्सी –
१. योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही लस्सी उत्पादनास सुरुवात करू शकता .
२. भारतात अमूल बरोबर अनेक कंपन्या पॅकेड बंद लस्सीची विक्री करतात.
३. तसेच मँगो लस्सी , हर्बल लस्सी यांस देखील बाजारात मागणी वाढत आहे.

आईस्क्रीम –
१. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडणारे आईस्क्रीम दुधापासूनच बनते.
२. आईस्क्रीम निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
३. विविध आईस्क्रीम पूरक उत्पादने देखील बनवता येते.

बाटलीबंद दूध –
१. शहरात आणि प्रवासात बाटली बंद दुधाची मागणी जास्त आहे.
२. या व्यवसायात बाटलीत दूध भरण्यासाठी मशीनची आवश्यकता भासते.
३. बाटली बंद दुधामध्ये इलायची , केसर , कॉफी यांचे फ्लेव्हर देखील मिसळता येतात.

दुधापासून तयार होणाऱ्या या पदार्थांना मोठ्या संख्येने मागणी आहे. या व्यवसायासाठी खर्च आणि उत्पादन कमी लागते.तुम्ही घरी देखील याचे उत्पादन घेऊ शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *