मनुके आणि मधाचे सेवन करा आणि फायदा स्वतःच बघा

Shares

मनुके आणि मध हे साथीच्या रोगांवर अत्यंत उपयोगी ठरतात. सध्या वातावरण सतत बदल होतो आहे त्यामुळे साथीचे रोग सुद्धा पसरत आहेत. मनुके आणि मध दोन्हींमध्ये असणारे लोह, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स कित्येक आजारांवर मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीराला खूप आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधामध्ये मिक्स करुन खाल्यास शरीरासाठी फायद्याचे ठरते.

१. मनुके आणि मधात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.
२. मनुके आणि मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
३. यामध्ये असणाऱ्या लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
४. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्याने चांगली झोप येते.
५. यातील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो.
६. मनुके आणि मधात असणाऱ्या फॉलिक ऍसिडमुळे गरोदर महिलांना त्याचा फायदा होतो.

त्यामुळे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या या बहुगुणी पदार्थांचे आपण योग्य पद्धतीने सेवन केले तर आपल्याला आपले आरोग्य उत्तम ठेवता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *