डाळिंबाची माहिती लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत

Shares

डाळिंब चविष्ट व पौष्टिक आहे. डाळिंब फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत.पचनक्रिया सुरळीत चालण्यास डाळिंब मदत करतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे , अहमदनगर , सांगली , सोलापूर , वाशीम येथे लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ७३०२७ हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखाली आहे. डाळींब पिकापासून भरपूर उत्पादन मिळवू शकतो. तर जाणून घेऊयात डाळिंब पीक लागवडीबद्दल माहिती.

जमीन व हवामान –
१. डाळिंबाचे पीक सुपीक , काली , निकस , भारी , मध्यम अश्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
२. पाण्याचा निचरा करणारी गाळाची जमीन निवडल्यास उत्पादन जास्त चांगले होते.
३. डाळिंब पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.
४. कडक उन्ह , कडक थंडीतही डाळिंबाचे पीक घेता येते.
५. भरपूर ऊन व कोरडे हवामान असल्यास डाळिंबाची फळे गोड येतात.

डाळिंबाच्या जाती –
१. मस्कत या जातीचे फळे आकाराने मोठे असतात. या फळांची साले फिक्कट हिरवी ते लाल रंगांची असतात. त्यांचे दाणे पांढरे व गुलाबी असतात. या वाणाचे उत्पादन चांगले होते.
२. गणेश वाणाची सर्वात जास्त संख्येने लागवड केली जाते. या फळात साखरेचे प्रमाण जास्त असते. या वाणापासून भरपूर प्रमाणात उत्पादन मिळते.
३. मृदुला वाणाची फळे लहान ते मध्यम आकाराची असतात. त्यांचे दाणे लाल रंगाचे असतात.

लागवड –
१. उन्हाळ्यात जमीन आडवी उभी नांगरट करून सपाट करून घ्यावी.
२. भारी जमीन असेल तर ५ x ५ मीटर अंतरावर लागवड करावी.
३. ६० x ६० सेमी आकाराचे खड्डे करून त्यात वाळलेल्या पालापाचोळ्याचा १५ ते २० सेमी जाडीचा थर टाकावा. या थरावर २० ते २५ किलो शेणखत , १ किलो सिंगल सुपरफॉस्फेट मिसळून जमीन भरून घ्यावी.
४. डाळिंब पिकाची लागवड पावसाळ्यात करावी.
५. डाळिंब पिकाची कलम लावल्यानंतर त्यास बेताचे पाणी द्यावे.
६. लागवडी नंतर काही काळ त्यास आवश्क्तेनुसारच पाणी द्यावे.

खते –
१. पहिल्या वर्षी १२५ ग्रॅम नत्र , १२५ ग्रॅम स्फुरद , १२५ ग्रॅम पालाश द्यावेत.
२. दुसऱ्या वर्षी २५० ग्रॅम नत्र , २५० ग्रॅम स्फुरद , २५० ग्रॅम पालाश द्यावेत.
३. तिसऱ्या व चौथ्या वर्षी ५०० ग्रॅम नत्र , २५० ग्रॅम स्फुरद , २५० ग्रॅम पालाश द्यावेत.
४.पाच वर्षांनंतर प्रत्येक झाडास १० ते १५ किलो शेणखत द्यावे.

पाणी व्यवस्थापन –
१. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
२. फळे येऊ पर्यंत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देणे.
३. फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित पाणी द्यावे.
४. अनियमितपणे व जास्त प्रमाणात पाणी दिले तर डाळिंब फळास तडे जातात.

आंतरमशागत –
१. झाडांच्या मुळाभोवतीची जमीन भुसभुशीत राहून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
२. बागेतील तण काढून हलकी मशागत करावी.

काढणी –
१. एका झाडावर ६० ते ८० फळे ठेवावीत . जास्त फळे ठेवल्यास फळे आकाराने लहान होतात.
२. फुलोऱ्यानंतर १५० ते २१० दिवसात फळे परिपक्व होतात.
३. अपरिपक्व किंवा अति परिपक्व फळे तोडल्यास फळांची प्रत बिघडते.
४. फळांचा रंग किंचित पिवळा झाला की त्यांची तोडणी करावी.

उत्पादन –
१. पाच ते सहा वर्षाच्या एका झाडापासून ७० ते ८० फळे मिळतात.
२. आठ ते दहा वर्षाच्या एका झाडासापासुन १५० ते २०० फळे मिळतात.
३. बुरशीनाशक प्रकिया करून ही फळे ९० दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात.

अश्या सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देणाऱ्या डाळिंब पिकाची लागवड नक्कीच तुम्हाला फायदा करून देईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *