कापूस ११ हजाराच्या काठावर,जाणून घ्या आजचे दर

Shares

खरीप हंगामातील कापूस आता अंतिम टप्यात असला तरी त्यास ११ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. कापसाला सुरुवातीपासूनच चांगला दर होता. मात्र मध्यंतरी कापसाला ६ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. मात्र आता हा दर ११ हजारांवर पोहचला आहे.

कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती आणि शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कापसाची टप्याटप्याने विक्री केली होती. त्यामुळे कापसाला मागणी ही सुरुवातीपासूनच कायम आहे. या सर्वाचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. असे म्हणण्यास हरकत नाही.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

कापसाचे आजचे दर

cotton bhav

वर्ध्यामध्ये सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला १० हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र आता काहीच प्रमाणात कापूस राहिला आहे. त्यामुळे शेतकरी फरदडच्या कापसाचा आधार घेत आहे.

उत्पादन घटले मात्र दर वाढले

खरीप हंगामातील मराठवाड्यासह विदर्भातील देखील कापूस हे मुख्य पीक आहे. परंतु यंदा अतिवृष्टी, अवकाळी मुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे.

कापसाला ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असतांना शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून टप्याटप्याने कापसाची विक्री केली होती. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ होऊन हे दर ११ हजारापर्यंत पोहचले होते. तर गेल्या ५० वर्षातील विक्रमी दर कापसाला मिळाला होता.

हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान

शेतकऱ्यांना फरदडचा आधार

कापसाचा मुख्य हंगाम संपला तरी फरदडच्या माध्यमातून शेतकरी कापूस उत्पादन घेण्याची परंपरा कायम आहे. यामुळे नुकसान होते माहिती असून देखील शेतकरी यंदा विक्रमी दर मिळत असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे कापसाचे उत्पादन घेण्याचे धाडस करत आहेत. तसेच एक मुख्य कारण म्हणजे कापसाचे दर हे स्थिर आहेत.

हे ही वाचा (Read This हा ज्यूस ३ तासात डायबेटीस रुग्णांची शुगर करेल कंट्रोल, तज्ज्ञांचा सल्ला

आता हंगामातील अंतिम टप्यातील कापसाचे दर पाहता शेतकऱ्यांनी फरदडचा कापूस घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर विदर्भात अजूनही अनेक जागी कापूस उभा दिसत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *