नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान

Shares

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण ५ हजार १४२ गावांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम तसेच उत्पादनक्षम बनविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

कसा होणार शिवाराचा कायापालट?

गाव हे केंद्र घटक मानून कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणीकरिता लोकसहभागातून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

हे ही वाचा (Read This ) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न

अश्याप्रकारे होणार अंबलबजावणी ..

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषीक्षेत्रात आपल्या महाराष्ट्राचा मोलाचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेवून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. अवकाळी पाऊस, ओला व कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठी त्या गावाचा सर्वांगिण विकास करताना पावसाचे प्रमाण, उपलब्ध पाणी, तेथील वातावरण आणि गरज लक्षात घेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी म्हंटले आहे.

विशेष प्रयत्न करणार ..

वातावरणाच्या बदलामुळे शेतकरी बांधवांना परिस्थितीसोबत जुळवून घ्यावे लागले. शेती व्यवसायासाठी पाण्याचा थेंब , थेंब वाचवणे आता गरजेचे झाले आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म नियोजन तसेच वेळोवेळी गावपातळीवर शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा जपून वापर व्हावा यासाठी गावातील छोटे व मोठे बंधारे यांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल.

अनुदान किती मिळणार ?

प्रकल्पासाठी निवड केलेल्या गावांना वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांसाठी २ हेक्टर पर्यंत ७५ % जमीन धारकांना तर २.५ हेक्टर जमीन धारकांना ६५ % अनुदान देण्यात येणार आहे.

महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *