सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

Shares

आगामी खरीप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासू नये, यासाठी बियाणे केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात सोयाबीन पेरण्याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.अनेक शेतकऱ्यांनी बियाणे केंद्रात नोंदणी करून सोयाबीनची पेरणी केली असून सोयाबीनची पेरणी योग्य बियाण्यापासून केली आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा (Read This ) सरकारचा तेलबियांच्या साठ्यावर कडक निर्बंध, परिणाम सोयाबीनच्या दरावर ?

आता बियाणे केंद्राचे अधिकारी व कर्मचारी जाऊन सोयाबीन पेरले आहे की नाही याची पाहणी करत आहेत. यंदा उन्हाळी सोयाबीनची सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रात पेरणी झाली असल्यामुळे भविष्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नसून, सोयाबीन योग्य प्रमाणात वाढले की नाही, याचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

यावर्षी प्रथमच सोयाबीनची विक्रमी लागवड
हंगाम नसतांना देखील शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरण्याची ही पहिलीच वेळ आहे.उन्हाळी पिकाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे परंतु आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित आहे आणि शेतकऱ्यांना जास्त उत्पादनाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

बियाणे उत्पादनातून शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो?
बियाणे केंद्राने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही रक्कम दिली जात होती. हरभरा १३१ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबीनला २०१८-१९ मध्ये २०० रुपये आणि १९-२० मध्ये ५०० रुपये बोनस दिला जात होता तसेच संचालक वल्लभराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १० टक्के सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *