पांढऱ्या जांभळाची लागवड करा, मिळवा भरघोस उत्पादनासह चांगला दर

Shares

शेतकरी यंदा पारंपरिक शेती बरोबर अनेक नवनवीन पिकांची लागवड करून आगळेवेगळे प्रयोग करत आहेत. अश्याच एका पांढऱ्या जांभळाची लागवड सराफवाडी येथील भारत लाळगे यांनी केली आहे. त्यांनी चालू वर्षात फळबागेतून जांभळाचे उत्पादन घेतले आहे.

हे ही वाचा (Read This ) सरकारचा तेलबियांच्या साठ्यावर कडक निर्बंध, परिणाम सोयाबीनच्या दरावर ?

या शेतकऱ्याने ओडिशा राज्यातून जांभळाची रोपे आणली व ठिबकवर एक एकर क्षेत्रावर १२द्व१२ फूट अंतरावर लागवड केली आहे. सध्या या जांभळाच्या बागेचे वय ३ वर्षे असून, बागेचा प्रथमच बहार धरला आहे. सध्या बाग फुलोऱ्यात असून, उन्हाळी हंगामाच्या अंतिम टप्प्यात फळे विक्रीसाठी तयार होणार आहेत.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

जांभुळमध्ये अनेक गुणधर्म दडलेले असून आयुर्वेदामध्ये जांभूळाचे बरेच महत्व आहेत. जांभूळ हे मधुमेहावर प्रभावी औषध समजले जाते. तर पांढऱ्या जांभळाला प्रतिकिलो प्रमाणे ३०० ते ४०० रुपये असा दर आहे.
पांढरे जांभूळ हे बाहेरून तसेच आतून देखील पांढऱ्या रंगाचे असून यास बाजारामध्ये आता बऱ्याच प्रमाणात मागणी होत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू आदी ठिकाणांवरून पांढऱ्या जांभळास मोठ्या प्रमाणात मागणी होत असते.

हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबर नवनवीन पिके घेण्यासाठी प्रयत्नशील असून आता खऱ्या अर्थाने शेती व्यवसायामध्ये बदल होतांना दिसून येत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *