बटाटा पिकावरील रोग व किडी नियंत्रण

Shares

भारत काय तर जगभर प्रसिद्ध असणाऱ्या बटाट्यावरील रोग व किडीचे व्यवस्थापन कसे करावेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.
बटाटा पिकावरील रोग नियंत्रण

करपा – पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर काळे ठिपके पडून पाने गळण्यास सुरुवात होते. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.
उपाय – १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम डायथेनएम मिसळून त्याची फवारणी करावीत.

मर – झाडे पिवळी दिसण्यास सुरुवात होते. जमिनीलगतच्या भागात बुरशीची वाढ होते.
उपाय- पिकांची फेरपालट करावीत. नियमित पानाच्या पाळ्या द्याव्यात.

खोक्या रोग किंवा चारकोल रॉट – या रोगाचा जमिनीतून प्रसार होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षा अधिक झाल्यास रोगजंतूंना पोषक तापमान ठरते. या रोगामुळे बटाटे नासतात.
उपाय- जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास बटाटयाची काढणी करावी. जमिनीस पाणी देऊन तापमान नियंत्रित करावे.

बटाटा पिकावरील कीड नियंत्रण –

देठ कुरतडणारी अळी – ही अळी राखाडी रंगाची असते. रात्रीच्यावेळी खोडाजवळील भाग कुरतडते . तसेच पाने व देठ खाते.
उपाय- या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो प्रमाने जमिनीवर सायंकाळी धुराळावीत.

मावा व तुडतुडे – या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून गाठण्यास सुरुवात होते.
उपाय – लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी १० मिली मिथिल डिमेटोन १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.

बटाट्यावरील पतंग – ही कीड बटाट्याचे सर्वात जास्त नुकसान करते. साठवणुकीच्या काळात याचे लक्षणे
दिसून येते. या किडीच्या अळ्या देठात , पानात शिरून सर्व पोखरून खातात.
उपय- या किडीवर नियंत्रण आणण्यासाठी डब्लू.पी , कार्बलील पाण्यात मिसळून फवारावेत.

बटाटयाच्या उत्तम उत्पादनासाठी वेळीच कीड व रोगाचे लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना करणे महत्वाचे आहे.

Shares