मालामाल बनवणारी टोमॅटो लागवड

Shares

रोजच्या आहारात टोमॅटो हे महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. टोमॅटोचा वापर हा जगभर मोठ्या संख्येने केला जातो. भाजी, चटणी , सलाड , सूप अश्या विविध पद्धतीने टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोस बाजारात चांगली मागणी असल्या कारणाने या पिकाची लागवड केल्यास भरगोस उत्पन्न मिळण्यास मदत होते. आपण आज टोमटो लागवड करतांना कोणत्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

टोमॅटो लागवड करतांना या बाबींची घ्या काळजी –
१. टोमॅटोची लागवड बाराही महिने कोणत्याही हंगामात जरी करता येत असली तरी प्रदेशानुसर याची लागवड करावीत.
२. उत्तर भारतात टोमॅटो लागवड वसंत ऋतूमध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात केली जाते.
३. उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड करायची असल्यास नोव्हेंबर ते डिसेंबर हा उत्तम महिना आहे.
४. टोमॅटो पिकाची लागवड करतांना जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी.
५. या पिकाची लागवड वाळूयुक्त चिकणमातीच्या करता येते परंतु पाण्याचा उत्तम निचरा करणारी निवडावीत.
६. टोमॅटोच्या अधिक उत्तम उत्पादनासाठी जमिनीच्या मातीचा सामू (पीएच ) हा ६ ते ७ च्या दरम्यान असावा.
७. टोमॅटो लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे गरजेचे आहे.
८. जमीन चांगली देशी नांगराने नांगरून भुसभुशीत करून घ्यावी.
९. कल्टिव्हेटर मारून जमीन समतल करून टोमॅटो पिकाची लागवड करावीत.

टोमॅटोच्या जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारित जाती
१. अविनाश २
२. अर्का सौरभ
३. एच एस १०१
४. ए आर टी एच ३
५. ए आर टी एच ४
६. को ३
७. एच एस १०२
८. एच एस ११०
९. सिलेक्शन १२
१०. हिसार अनमोल (एच २४)

सुधारित जातीची लागवड करून टोमॅटोचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येते. बाजारात तसेच अनेक कंपन्या टोमॅटोची मोठ्या संख्येने खरेदी करतात त्यामुळे भरगोस उत्पन्न मिळ्वण्यासाठी टोमॅटो लागवड हा उत्तम पर्याय असू शकतो.

Shares