शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

Shares

जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला जमिनीचे आरोग्य जाणून घेणे गरजेचे आहे. जमिनीच्या गुणवत्तेवर पिकाची वाढ, उत्पादन , उत्पन्न अवलंबून असते. जर जमिनीमध्ये कॅल्शिअम ची कमी असेल तर त्याचा वाईट परिणाम पिकांवर होतो. अश्यावेळेस शेतकरी मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्सम चा वापर करतात.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

साधारणतः शेतकरी शेतीसाठी नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस चा वापर करतात. मात्र शेतीसाठी कॅल्शिअम तसेच सल्फर चा वापर करत नसल्यामुळे जमिनीमध्ये सल्फर , कॅल्शिअम ची कमतरता भासत आहे. जिथे सघन शेती केली जाते अश्या जमिनीमध्ये कॅल्शिअमची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जिप्सम चा वापर केला जातो.
जिप्समचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट असून त्यामध्ये २३.३ टक्के कॅल्शियम आणि १८.५ टक्के सल्फर असते.

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

जिप्समचे फायदे

  • जिप्सम कॅल्शिअम तसेच सल्फर ची कमतरता भरून काढून पिकांच्या मुळाचा वाढीस मदत करते.
  • जिप्सम मध्ये मुबलक प्रमाणात सल्फर उपलब्ध असल्यामुळे पिकांचे संरक्षण होते.
  • तेलबिया पीक घेतांना जिप्सम चा वापर केल्यास पीक, तेल यांच्या सुवासासाठी उपयुक्त ठरते.
  • जिप्सम चा वापर केल्यास मातीतील कॅल्शिअम बरोबर नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशिअम यांची वाढ होते.
  • जिप्सम जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.

हे ही वाचा (Read This) सेंद्रिय शेतीबाबतचा मोठा संभ्रम दूर- सेंद्रिय शेतीची उत्पादकता केमिकलच्या तुलनेत २०% ते २५% टक्के जास्त ICAR

जमिनीमध्ये कॅल्शियम कमी असण्याचे लक्षणे

  • कॅल्शिअम ची कमतरता असेल तर पानांचा काही भाग पांढरा होतो.
  • झाडांची पाने आकसून जाऊन मोडतात.
  • कॅल्शिअम जास्त प्रमाणात कमी असेल तर पिकांची वाढ खुंटते.
  • पीक सुकण्यास सुरुवात होते.

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

जिप्सम चा वापर कसा करावा?

  • जिप्सम ला पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीला दिले जाते.
  • जिप्सम टाकण्यापूर्वी जमीन २ ते ३ वेळा चांगली नांगरून घ्यावी.
  • जिप्सम त्यानंतर मातीमध्ये मिसळावेत.
  • साधरणतः प्रति हेक्टर १० ते २० किलो कॅल्शिअम भात त १५ किलो कॅल्शिअम कडधान्य जमिनीमधून घेतात.

हे ही वाचा (Read This) कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार !

जिप्सम चा वापर करतांना काय काळजी घ्यावी?

  • जिप्सम ला जमिनीपासून थोडे वर ठेवावे तसेच नरम जागी ठेवण्यापासून टाळावे.
  • मृदा परीक्षण करूनच जिप्सीमचे प्रमाण ठरवावेत.
  • जोरदार हवा असेल तर जिप्समचा छिडकाव करू नका.
  • संपूर्ण शेतामध्ये जिप्सम चा समान प्रमाणात छिडकाव करावा.
  • जिप्सम चा छिडकाव केल्यानंतर माती चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी.
  • लहान मुलांपासून जिप्समला दूर ठेवावेत.

मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्समचा वापर करणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *