तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापण…

Shares

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनत ओल आहे, त्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे काही ठिकाणी कळी किंवा फुलोन्यावर अवस्थेत आहे. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तुर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी आपल्या पिकाची पाहनी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवशक आहे. शेंगा पोखरणा-या अळयांमधे खालील प्रकारच्या अळयांचा समावेष होतो.

शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव):-

या किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करडया रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

२. पिसारी पतंग :- या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळीर्शगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते.

३. शेंगे माशी :- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक व्यवस्थापणः

या तिनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.

१. प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळया खाऊन फस्त करतात.

२. पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना)
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१x१०°पिओबी/मिली) ५०० एल.ई./हे. किंवा बॉसिलस थुरिनजिएंसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ई.सी.,२० मि.ली. प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी)
इमामेक्टीन बेझोएट ५टक्के ३ एस जी ग्रॉम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन ५टक्के प्रवाही १० मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४. अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे
झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *