टोमॅटोवरील रोग व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

Shares

टोमॅटो महाराष्ट्रात महत्वाचे पीक मानले जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी टोमॅटोचे पिक घेतात. टोमॅटो पासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. टोमॅटो पिकाचे सर्वात जास्त नुकसान विविध किडी , रोगांमुळे होते. या रोग , किडींचे व्यवस्थापन कसे करावेत हे आपण आज जाणून घेऊयात.

टोमॅटोवरील किडींचे व्यवस्थापन –

१. फळे पोखरणारी अळी –

पतंग अळी पानांवर , फुलांवर अंडे घालतात. पानांवर राहणारी अळी पाने , फुले खाऊन वाढतात.त्यांचे अर्धे शरीर ते फळामध्ये ठेवतात. त्यामुळे फळांना छिद्रे पडून ते सडण्यास सुरु होतात. जानेवारी ते मे महिन्यात या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो.
उपाययोजना – बॅसिलस थुरीन्जिएन्सीस २५ किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन २५ मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड २ मिलि. डायमेथोएट १६ मिलि, किंवा इमिडाक्‍लोप्रीड ३ मिलि द्यावे.

२. तुडतुडे , मावा व फुलकिडे –

मावा , तुडतुडे पानांतील अन्नरस शोषून घेऊन विषारीजन्य रोगांचा प्रसार करतात.या किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर झाडाची पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते.
उपाययोजना – टोमॅटोची लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास इमिडाक्‍लोप्रिड किंवा थायामेथोक्‍झाम ५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात ठेवावे.

टोमॅटोवरील रोगाचे व्यवस्थापन –
१. करपा –

हा बूसरशीजन्य रोग आहे. दमट हवामान करपा रोगासाठी पोषक ठरते. या रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. फळांवर चट्टे पडून त्यांची प्रत खालावते.
उपाययोजना – करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी झायनेब , डाइथेन एम-४५ २ किलो फवारणी करावी. ३० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२. लाल कोळी –

लाल कोळी पानांतील रस शोषून घेतात.त्यामुळे पाने पांढरी दिसतात. झाडावर रेशमी रंगाची जाळी तयार करतात.यामुळे उत्पादनात घट होते.
उपाययोजना – लागवड केल्या नंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने २० ग्रॅम गंधक १० लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

३. बोकड्या / पर्णगुच्छ –

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांची वाढ खुंटते. पानांचा रंग फिकट सुरवातीला फिकट हिरवा होऊन नंतर पिवळा होतो. जुनी झालेली पाने ठिसूळ दिसू लागतात. पांढऱ्या माशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे पिकांचे मोठ्या संख्येने नुकसान होते.
उपाययोजना – या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांवर १० मिली डायमेथोइड १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा फवारणी करावी.

अश्या प्रकारे तुम्हाला टोमॅटोवरील किडी , रोगांचे व्यवस्थापन करता येते. तरीही कोणतेही रासायनिक फवारणी , खते वापरण्यापूर्वी एकदा शेती सल्ला अवश्य घ्या.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *