कढीपत्ता लागवड कशी आहे फायदेशीर

Shares

जवळ जवळ सर्वच भाजी बनवतांना आपण काडिपत्यांचा वापर करतो. कढीपत्याचा वापर चटणी , चिवडा इत्यादी पदार्थांमध्ये देखील मोठ्या संख्येने करतो. कढीपत्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. कढीपत्त्याची लागवड करून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. चला जाणून घेऊयात कढीपत्ता लागवडी बद्दल संपूर्ण माहिती.

जमीन व हवामान –
१. कडीपत्ता ची लागवड हलक्या , काळया , वाळूमिश्रित , लाल , कसदार जमिनीत करता येते.
२. पाण्याचा निचरा न होणारी जमीन कढीपत्ता लागवडीसाठी निवडू नये.
३. खडकाळ , मुरमाड जमिनीत कढीपत्याची लागवड करता येते परंतु उत्पादन जास्त प्रमाणात मिळत नाही.
४. कढीपत्ता लागवडीसाठी उष्ण हवामान मानवते.
५. या पिकास २६ ते ३७ अंश.से तापमान उत्तम ठरते.

कढीपत्त्याच्या जाती –
१. धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने सेन कांपा , डीडब्लूडी -१ , डीडब्लूडी -२ या जाती विकसित केल्या आहेत.
२. मोठ्या पानांचा आणि लहान पानांचा कढीपत्ता लागवड करते येते.

लागवड प्रकार –
१. बी टोकून – बी टोकून लागवड केल्यास ३ आठवड्यांनी रोप उगवते. रात्रभर बिया पाण्यात बुजवून ठेवून रोप उगवण कालावधी कमी करता येतो. एका बियापासून २ ते ३ रोपे बाहेर पडतात.
२. रोप लागवड – एक वर्षांच्या रोपांची लागवड करता येते. २ ते ३ फूट उंचीची रोपे लावता येतात.

लागवड पद्धत –
१. स्वतंत्र लागवड करताना १.२ ते १.५ मीटर बाय १.२ मीटर अंतरावर ३० x ३० x ३० सेमी आकाराचे खड्डे खणावेत.
२. साधारणतः २५ ते ३० दिवस हे खड्डे उन्हात तापू द्यावे.
३. त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत , सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो मातीत मिसळून टाकावेत.
४. पावसाळयाच्या सुरुवातीस या रोपांची लागवड केल्यास ही रोपे चांगल्या प्रकारे रुजतात.
५. दुहेरी पद्धतीने लागवड करतांना दोन रोपांमध्ये ३० सेमी, दोन रांगांमध्ये १ मीटर अंतर सोडावेत.
६. झाडाच्या मुळाजवळ फुटवे येतात त्यापासून देखील लागवड करता येते.
७. पावसाळयाच्या सुरवातीस ही फुटवे खणून काढून त्यांची लागवड करावी.

पाणी व्यवस्थापन –
१. जमीन भारी असेल तर हिवाळ्यात महिन्यातून एकदा पाणी द्यावे.
२. जमीन हलकी असेल तर हिवाळ्यात महिन्यातून दोनदा पाणी द्यावे.
३. भारी जमीन असल्यास उन्हाळ्यात २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
४. हलकी जमीन असल्यास उन्हाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने पाणी दयावे.
५. पावसाळ्यात गरज असेल तरच पाणी द्यावे.

काढणी –
१. लागवडीनंतर ९ ते १२ महिन्यांची काढणी करावी.
२. वर्षातून ३ ते ४ वेळा काढणी करता येते.

उत्पादन –
१. पहिल्या वर्षी प्रति एकरी ५ ते १० टन उत्पादन मिळते.
२. दुसऱ्या वर्षांपासून ५ ते ८ वर्षापर्यंत १५ ते २० टन उत्पादन मिळते.

कढीपत्त्याची योग्य प्रकारे लागवड केली तर त्यापासून चांगला फायदा होऊ शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *