‘शाब्बास रे पठया’- या तरुण शेतकऱ्याने घेतले ६० दिवसात ६ लाखांचे उत्पन्न

Shares

लॉकडाऊन मध्ये शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे अनेकांनी नवीन नवीन प्रयोग करून पहिले तर अनेकांनी याचा चांगला फायदा उचलला. अश्याच एका दक्षिण सोलापूरमधील युवकाने लॉकडाऊनचा पुरेपूर वापर करत दीड एकरात कलिंगड लागवड करून ६० दिवसात ६ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले.

ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर

मंद्रूप येथील येळेगावात शैलेश मुंजे यांची ८ एकर शेती असून लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड असल्यामुळे ते नेहमी आपला मुलगा श्रीकांत सोबत शेतीचे वेगवेगळे प्रयोग असतात. सध्या त्यांनी २ एकरात द्राक्षे, दीड एकरात कलिंगड सोबत अजून काही पिकांची लागवड केली आहे. त्यांनी खरीप हंगामात पपईचे उत्पादन घेतले होते.

हे ही वाचा ( Read This) राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, शेकडो कोंबड्यां मृत्युमुखी

६० दिवसातच ४५ टन उत्पादन

वडील आणि मुलाने डिसेंबर महिन्यात युनिको कंपनीचे व्यंकट एफ १ या वाणाची कलिंगडाची लागवड करून कृषी केंद्र चालकांचे योग्य मार्गदर्शन घेऊन दीड एकरात ८५०० रोपांची लागवड केली. त्यांनी कृषी केंद्राचा सल्ला घेऊन आवश्यक असणाऱ्या कीटकनाशकांची फवारणी करून अगदी चांगल्या पद्धतीने कलिंगडाची शेती फुलवली. जवळजवळ ६० दिवसानंतरच एका कलिंगडाचे वजन हे ५ ते ६ किलो झाले असून दीड एकरात त्याने ४५टन उत्पादन घेतले.

व्यापाऱ्यांकडून मोठ्या संख्येने मागणी …

त्यांनी एका व्यापाऱ्यास शेतात बोलवून कलिंगडची पाहणी करण्यास सांगितली आणि त्या व्यापाऱ्याने साडेतेरा रुपये किलो प्रमाणे दर ठरवून विकत घेतले. या वाणाचे कलिंगड गोड आणि रंगाने लाल तसेच वाहतुकीस या कलिंगडला काहीही धोका नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून या कलिंगडास मागणी वाढली.

हे ही वाचा ( Read This) माती चे शोषण नाही पोषण करा….

दोनशेहून अधिक शेतकरी कलिंगड पाहणी करण्यासाठी गेले होते

थंडीच्या दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेणे थोडे जिक्रीचे काम असते खरं मात्र चांगल्या वाणाची निवड करून योग्य पद्धतीने नियोजन केल्यास उत्तम उत्पादन घेणे शक्य होते. असे शेतकऱ्याने सांगितले. त्याने दीड एकरात ४५ टन उत्पादन घेतले असून युनिको व्यंकट कंपनीने त्यांचा सत्कार केला. या कलिंगडची पाहणी करण्यासाठी उत्तर सोलापूर, मोहोळ, तुळजापूर, पंढरपूर अश्या आजूबाजूच्या अनेक ठिकाणांवरून शेतकरी आले होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *