राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, शेकडो कोंबड्यां मृत्युमुखी

Shares

पोल्ट्री फार्म असणाऱ्यांना आता घ्यावी लागेल थोडी काळजी. कारण राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. शहापूर तालुक्यातील वाशिंदजवळ पाषाणे गावात एका पोल्ट्री फार्ममधील जवळजवळ शेकडो कोंबडया अज्ञात आजाराने अचानक मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यानंतर फार्म मधील कोंबड्यांची तपासणी केल्या नंतर असे निदर्शनास आले की त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाला आहे. या कोंबड्यांची तपासणी भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थानने केली.

१ किमीमधील सर्व कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश …

कोंबड्यांचे बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाला आहे असे कळताच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तात्काळ पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या हजारो कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर १ किमी परिसरातील सर्वच कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर याची अंबलबजावणी करावी असे पशुसंवर्धन विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

हे ही वाचा ( Read This) माती चे शोषण नाही पोषण करा….

महत्वाच्या उपाययोजना

पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाल्याचे निदर्शनास येताच १ किमी परिसरातील चिकन विक्री तसेच वाहतूक संसर्गमुक्त होत नाही तोपर्यंत निर्बंध ठेवण्यास सांगितले आहे. बर्ड फ्ल्यू हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचा प्रसार होऊ नये म्हणून मृत्युमुखी पडलेल्या पक्षांची विल्हेवाट लावणे, बाधित क्षेत्रातील पशुखाद्य, अंडी नष्ट करणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाई शासन किती देणार ?

बर्ड फ्ल्यू हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती विभाग यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू केली असून परिसरातील ६ पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली असून हजारो पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय असणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर झालेली नुकसान भरपाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र आता सर्वर किती भरपाई देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *