लाल मिरचीचा ठसका, दर १५ हजारांवर

Shares

यंदा बदलते वातावरण तसेच अतिवृष्टीमुळे मिरचीचे ६० ते ७० टक्के असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या बाजारामध्ये मिरचीला ( Chilly)३ हजार ते १५ हजार प्रमाणे दर मिळत आहे.अशी माहिती सोलापूर ( Solapur) बाजार समितीचे मिरची असोशिअन चे अध्यक्ष सिद्राम नरोणे यांनी दिली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून मिरचीचे आगमन होत असून साधारणतः दररोज ३ हजार पोती मिरची बाजारात येत आहे. मागील वर्षी मिरचीला १२ हजार रुपयांचा दर होता मात्र आता अतिवृष्टीमुळे माचीच्या दरात वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे मिरचीला पांढरा रंग येऊन त्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

हे ही वाचा ( Read This ) कापसाला मिळतोय विक्रमी दर, मात्र व्यापाऱ्यांचा गोलमाल

परराज्यातून होत आहे मिरचीची आवक
यंदा मिरचीचे नुकसान झाल्यामुळे आवक कमी झाली असून सोलापूर बाजार समितीमधील स्थानिक शेतकरी फक्त हिरव्या मिरचीची (Green Chilly) विक्री करतात. त्यामुळे लाल मिरचीचे (Red Chilly) प्रमाण कमी आहे. त्यामुळे परराज्यातून मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक होतांना दिसून येत आहे. सोलापूरमध्ये लाल मिरचीची मोठी बाजारपेठ असून शेतकऱ्यांना रोखपट्टी तुरंत मिळत असल्यामुळे शेतकरी सोलापूरमध्ये मोठ्या संख्येने लाल मिरची विक्रीसाठी आणत आहेत. यामध्ये कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

हे ही वाचा ( Read This ) मधमाशीपालनासाठी लागणारी आवश्यक उपकरण

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *