कापसाला मिळतोय विक्रमी दर, मात्र व्यापाऱ्यांचा गोलमाल

Shares

शेतकऱ्यांना यंदा नैसर्गिक तसेच आर्थिक अश्या दोन्ही संकटांचा सामना करावा लागला असून खरीप हंगामातील सर्व पिकांचे अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाचे देखील अवकाळी मुळे नुकसान झाले अवकाळी मुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. मात्र कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने उत्पादनातील घट बाजार भाव भरून काढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दराने कापूस विक्री करण्यासाठी कापसाची साठवणूक केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या या निर्णयास बाजारपेठ देखील अनुकूल आहे. मात्र विक्रमी बाजार भाव मिळत असला तरी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होतांना दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

व्यापाऱ्यांकडून होत आहे फसवणूक
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना काट्यात झोल करत आहेत. आपल्याकडे मापात कपात केली तर त्याला पाप समजले जाते, मात्र जिल्ह्यातील कापूस व्यापारी सर्रासपणे मापात झोल करत आहेत. यामुळे विक्रमी बाजार भाव असतानादेखील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील कापूस व्यापारी कापसात पालापाचोळा असतो असे म्हणत एक क्विंटल कापसाचा मागे अर्धा किलो कापसाची कपात अर्थात कटनी करत आहेत. त्यामुळे वाढीव दर असताना देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री परवडत नाही एकंदरीत अमरावतीत दुरून डोंगर साजरे सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आहेत. त्यामुळे बाजारपेठेत योग्य मूल्यमापन करण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे. या हंगामात कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने कापसाची मागणी वाढली परंतु मागणीप्रमाणे पुरवठा झाला नाही परिणामी कापसाच्या दरात वाढ झाली. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने या हंगामात व्यापारी शेतकऱ्यांचे उंबरठे झिजवत माल खरेदी करतांना दिसत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *