उन्हाळी सोयाबीनच्या शेवटच्या महिन्यात अशी घ्या काळजी

Shares

कृषी विभागाच्या आव्हानानंतर पीक पद्धतीमध्ये बदल झाला असून शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. उन्हाळी हंगाम,आत देखील शेत शिवार हे हिरवेगार दिसत आहेत. आतापर्यंत सर्व सुरळीत सुरु असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. मात्र सोयाबीनच्या पिकांना शेंगाचा अजून आल्या नसल्यामुळे तर काही ठिकाणी शेंगा आल्या आहेत मात्र शेंगांचे वजन पेलत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत

काही क्षेत्रावर सोयाबीनची पाने झाडं वाळू लागतात. आशा वेळी झाडांची मुळी बंद झाली आहे. त्यामुळे अशा वेळी म्युरेट ऑफ पोटॅश(पालाश) एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात फवारणी केल्यास जमिनीतून पालाश ह्या अन्नद्रव्यांची अपव्यय होत नाही. शिवाय वरून फवारणी केल्यास त्याचा चांगला परिणाम आपणास मिळतो.

सोयाबीनच्या झाडांची अजूनही मुळी सुरु असल्यामुळे पालाशचे शोषण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतल्यामुळे सोयाबीनचे दाणे भरण्यास मदत होते.

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

मळणी करतांना काय काळजी घ्यावी?

सोयाबीन मळणीचे नियोजन करणे गरजेचे असून सोयाबीनच्या झाडाची पाने वाळण्यास सुरुवात होताच त्याचे नियोजन करण्यास सुरुवात करावी. मळणी सुरु करतांना हवामानाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्याच्या अनुषंगानेच सोयाबीन काढणीचा कार्यक्रम करावा लागतो. आता मात्र मजुरांची टंचाई लक्षात घेता योग्य अश्या वेळी काढणी तसेच मळणी यांचे नियोजन करणे महत्वाचे आहे.

वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ताडपत्री, बारदान आणि इतर सर्व सामग्री तयार ठेवावी लागणार आहे.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाढला अधिकच खर्च

एकीकडे शेतकरी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे फवारणीचा तसेच निगराणीचा खर्च वाढत चालला आहे. सोयाबीन हे पावसाळी पीक असले तरी यंदा उन्हाळी सोयाबीन प्रयोग केला आहे.
या प्रयोग मुबलक पाण्यामुळे शक्य झाला असून महिन्याभराचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे.

नेहमी ४ वेळा कराव्या लागणाऱ्या फवारण्या आता १० वर गेल्या आहेत. वातावरणात बदल सुरु झाला असून काढलेले सोयाबीन हे पावसात भिजणार नाही याची काळजी शेतकऱयांना घ्यावी लागणार आहे. शेतकऱयांना सोयाबीनची काळजी योग्य पद्धतीने घ्यावी लागणार आहे जेणेकरून नुकसान होणार नाही तसेच अधिक उत्पन्न मिळेल.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *