कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

Shares

शेतकरी सतत अश्या पिकाच्या शोधात असतात जे पीक कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवून देईल. तर आपण आज अश्याच एका पिकाची माहिती घेणार आहोत.

आपल्या दररोज च्या जेवणात हमखास वापर करणाऱ्या मोहरीची लागवड करून शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळवू शकतो. सध्याचा काळ पहिला तर दिवसेंदिवस तेलाच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मोहरी लागवड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

मोहरी त्वचेसाठी चांगली असते. तर आहारासाठी पौष्टिक असते.मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्यास बाराहीमाहीने मोठ्या संख्येने मागणी असते.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

हवामान आणि जमीन

  • रब्बी हंगमात मोहरीची लागवड केली जाते.
  • मध्यम ते भारी जमिनीत याची लागवड करता येते.
  • पेरणीच्या वेळेस तापमान हे १६ – २२ अंश सें/ग्रे पर्यंत असावे त्या पेक्षा जास्त नसावेत .
  • उत्तम वाढीसाठी तापमान जवळ जवळ १८-२५ अंश सें/ग्रे असावेत.
  • मोहरी पिकासाठी सेंद्रिय पदार्थ असलेली चिकणमाती माती योग्य आहे.
  • ५.८ ते ६.७ पर्यंतचा मातीचा पीएच मोहरी लागवडीसाठी योग्य आहे.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

लागवड

  • मोहरीची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली ३-४ वेळा नांगरणी करावी.
  • देशी नांगरट किंवा सीड ड्रिलने बियाणे ओळीत पेरावे.
  • खूप खोलवर पेरणी केल्यास बियाण्याच्या उगवणावर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे २ ते ३ सेमी पेक्षा खोल पेरणी करू नये.

मोहरीच्या सुधारित जाती

  • रोहिणी
  • जे. M -1
  • जे. M.-2
  • वरुण
  • पुसा गोल्ड
  • पुसा जय किसान

हे ही वाचा (Read This ) शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, असा करा अर्ज ३१ मार्चपूर्वी

लागवड खर्च व उत्पन्न

  • मोहरी पिकाला इतर पिकांपेक्षा कमी खर्च येतो. कारण मोहरी पिकात पाणीही कमी असते. याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो.
  • हेक्टरी २० क्विंटल मोहरीचे उत्पादन होते.
  • शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळतो.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *