उन्हाळी सोयाबीन, शेतकऱ्यांना घ्यावी लागणार ही काळजी !

Shares

खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर यंदा रब्बी हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जात असले तरी रब्बी हंगामात सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला आहे. वातावरणातील बदलामुळे पिकावर झालेला थोडा परिणाम सोडला तर सोयाबीन शेतात जोमात बहरतांना दिसत आहे. खरीप हंगामात बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. अश्या वेळेस बियाण्यांचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे कृषी विभागाने यंदा बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी सोयाबीनचा पेरा करण्याचे अवाहन केले होते.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

बियाणे तयार करण्यासाठी घ्या काळजी
यंदा सोयाबीनचा पेरा जोमात झाला आहे. सोयाबीनचा पेरा झाल्यापासूनच त्याचा उपयोग बियाणासाठी करण्याच्या हेतूने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पीक 20 ते 25 दिवसाचे असताना मशागत करुन सोयाबीन तणविरहीत ठेवणे गरजेचे आहे. मशागतीची कामे ही फुले लागण्याच्या आगोदरच करणे गरजेचे अन्यथा सोयाबीनच्या मुळांना नुकसान होते. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाठानी पाणी द्यावे लागणार आहे. शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनची उपयुक्तता कमी असते त्यामुळे त्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

किडीचा प्रादुर्भाव, उत्पादकतेत घट
उन्हाळी हंगामात सोयाबीनला कमी उतारा असल्यामुळे उत्पादन पेक्षा खरिपातील बियाण्याचा प्रश्न मिटेल यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेत आहेत. सोयाबीनवर पाने कुरताडणारी अळी, घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. त्यामुळे कृषी विभागाचा योग्य सल्ला घेऊन आधीच फवारणीची तयारी करून ठेवावी. सध्या सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी पोषक हवामान असल्यामुळे शेतकरी सध्या शेतीकामाकडे जास्त लक्ष देत आहे.

हे ही वाचा (Read This )  या जिल्ह्यात १०० ड्रोन कृषी सेवा उभारण्याचा निर्धार

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *