आता शेतकऱ्यांना मिळणार १२ अंकाचा युनिक आयडी !

Shares

भारतामधील अंदाजे ५० ते ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. एवढेच काय तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना राबवण्यात आलेल्या नवीन योजनांची माहिती होऊन त्याचा लाभ घेता यावा यासाठी शेतकऱ्यांना १२ अंकी युनिक आयडी देण्यात येणार आहे. यासाठी ५.५ कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकार या प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. रोबोट, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग कश्याप्रकारे शेतीसाठी उपयुक्त ठरू शकते याचे परीक्षण केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेचा अगदी सहजपणे लाभ घेता यावा तसेच देशभरातील सर्व शेतकरी जोडून राहावेत. यासाठी हा १२ अंकी युनिक आयडी देण्यात येणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे नाव डेटाबेस मध्ये समाविष्ट असेल अश्यानाच हा आयडी देण्यात येईल. याच्या माध्यमातून शेतकरी कोणत्या बियाणांचा , तंत्राचा वापर करत आहे याची संपूर्ण माहिती सरकारकडे असेल. केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्टसाठी अनेक कंपन्यासोबत करार केला आहे. शेतकरी या पायलट प्रोजेक्ट चा आधार घेऊन बियाणे, पीक , बाजारातील अनेक महत्वाच्या माहितीचा वापर उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *