तापमानात वाढ होताच कलिंगडाची मागणी वाढली, दर वाढण्याची शक्यता

Shares

यंदा दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे सर्वच नागरिक परेशान झाले आहेत. अश्यात रसाळ, पाणीदार फळांची खरेदी करण्यासाठी सर्वांची गर्दी होत आहे.. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते.

हे ही वाचा (Read This) आता या राज्यात गाय किंवा म्हैस पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना !

कलिंगडच्या किमतीत लवकरच वाढ होण्याची शक्यता

उन्हाळ्यात सर्वांनाच टरबूज खाणे आवडते. त्यामुळे ज्यूस सेंटर वर कलिंगडचा रस पिण्यासाठी तसेच कलिंगडच्या हातगाडीवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे, त्यामुळे कलिंगडउत्पादक शेतकरी समाधान मानत असून मागील काही दिवसांपासून नैसर्गिक संकट उध्दभवत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. मात्र आता कलिंगडचे चांगले उत्पादन मिळाले आहे.

कलिंगडची वाढती मागणी पाहता कलिंगडच्या किमतीमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. सध्या टरबूज हे २० ते ३० रुपये किलोने विकले जात आहे.कलिंगडमध्ये शुगरक्कीन जातीच्या कलिंगडची मोठी मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

कलिंगड खाण्याचे फायदे

  • कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पाण्याची कमतरता कमी होते.
  • वजन कमी करण्यासाठी टरबुजाचे रोज सेवन करावे..
  • कलिंगड खाल्ल्याने पोट ही भरते आणि फॅट्सही तयार होत नाही.
  • कलिंगडमध्ये व्हीटॅमीन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते.
  • कलिंगडमध्ये शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. याचा मोठा फायदा डोळ्यांना देखील होतो
  • कलिंगडमुळे तुमची त्वचा अधिक चांगली राहते.
  • कलिंगडसोबत काळं मीठ आणि काळी मिरी खाल्याने अपचनाती समस्या दूर होते आणि पचन क्रिया चांगली राहते.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *