शेतक-यांना श्रीमंत करणारी केसरची शेती

Shares

खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केसर वापरले जाते. केसर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात होत असणारी केसरच्या शेतीचे प्रयोग आता अनेक राज्यांमध्ये होत आहे. अस्सल केसर मिळणे भरपूर अवघड झाले आहे.केसर ची शेती करून शेतक-यांना लाखो रूपयाची कमाई सहज होऊ शकते. केसरचे भाव इतके वाढले आहेत की याला लाल सोने असे नावाने लोक ओळखत आहेत .भारतातील केशराचे शाही केशर, मोग्रा केशर आणि लांचा केसर असे तीन प्रकार आहेत. शाही केसर उच्च प्रतीचे असते, तर लांचा केसर हे हलक्या प्रतीचे असते.

केसरचे फायदे –
१. केशर सुवासिक, उत्तेजक, शक्तिवर्धक, मूत्रल आणि रेचक असते.
२. केशर श्वसननलिकादाह, घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असते.
३. खरचटणे, साध्या जखमा, संधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात.
४. केशराचा प्रमुख उपयोग मिठाई व इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात. ५. लोणी, चीज, केक, श्रीखंड, बासुंदी, लाडू, खीर, मसाला दूध, बिर्याणी अशा विविध खाद्यपदार्थांत केशर मिळसतात. मात्र केशर सुवासिक असले, तरी चवीला कडू असते.
६. केशरात असलेल्या क्रोक्रेरीन या घटकामुळे खाद्यपदार्थांना रंग, तर पिक्रोक्रॉसीन आणि सॅफ्रॅनल या घटकांमुळे चव आणि गंध प्राप्‍त होतो.

केसरची किमंत –
१. भारतामध्ये केसरची किमंत या वेळेला २,५०,००० ते ३,००,००० प्रति किलो पर्यंत आहे. २. यासाठी १० वॉल्व बीयाचा उपयोग केला जातो, त्याची किमंत ५५० रूपये इतकी आहे.

केसरचे उत्पादन करत असाल तर या गोष्टी जाणून घ्या
१. केसरच्या उत्पादनासाठी आपल्याला लक्षात ठेवावे लागेल की, ज्या शेतीत आपण केसरची शेती करणार आहोत त्याची माती रेतीदायक, चिकनी, वालुकामय नाही तर चिकणमाती असलेली शेती पाहिजे.
२. परंतु केसरच्या शेती दुस-या मातीमध्ये पण सहजरित्या येऊ शकते.
३. एकाच ठिकाणी पाणी जास्त वेळ जमा राहिल्यास केसर खराब होऊन जाते आणि पिक बर्बाद होऊन जाते त्यामुळे अशा प्रकारची जमीन निवघावी जेथे पाणी जमा होणार नाही.

पूर्वमशागत –
१. केसरचे बीयाने लावण्याच्या अगोदर शेतीची चांगल्या पध्दतीने नागरून घ्यावी.
२. यानंतर रोटरने माती भुसभुशीत करून २० टन शेणखत आणि त्यासोबत ९० किलोग्रॅम नाइट्रोजन ६० किलोग्रॅम फास्फोरस आणि पोटॅश प्रति हेक्टर प्रमाणे शेतात टाकावे.
३. यामुळे आपली जमीन उर्वरक राहील आणि केसरचे पिक चांगल्या होईल.

बीयाने लावण्याचा वेळ –
१. कोणत्याही पिकाला रोपन करताना किंवा पेरणी करताना एक निश्चित वेळ असते आणि जर योग्य वेळेला बीयाने पेरणी न केल्यास चांगले पिक येत नाही.
२. त्यामुळे बीयाने हे निश्चित वेळेलाच पेरावे किंवा रोपावे. केसरच्या पिकासाठी योग्य वेळ उंच पहाडच्या जमीनीत जुलै ते ऑगस्ट आहे.
३. तरीही मध्य जुलैच्या महिन्यातली वेळ सर्वश्रेष्ठ असते.
४. मैदान क्षेत्रात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पेरणी करावी.

उत्पादन आणि विक्री –
१. एकदा केसरची पिक निघाल्यानंतर याला चांगल्या पध्दतीने पॅक करून जवळच्या मार्कटमध्ये चांगल्या भावाने विकु शकतात.
२. अस्सल केसरचे डिमांड सर्व ठिकाणी आहेत आपण आपल्या शेतात केसर पिकवू शकतात. आणि चांगल्या किमंतीत विकु शकतात.
३. आपण केसरची ऑनलाईन विक्री करू शकतात.

केसर ची मागणी भारता बरोबर परदेशात देखील आहे, ही शेती तुम्ही कमी जमिनीवर करून सुद्धा मोठ्या संख्येने पैसे कमवू शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *