RBI: क्रेडिट कार्डसाठी 1 जुलैपासून लागू होणार नवीन नियम, क्रेडिट कार्डधारकाशी बँका मनमानी करू शकणार नाहीत.

Shares

RBI ने बनवलेल्या नवीन नियमांनुसार आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करणाऱ्या बँका ग्राहकांशी मनमानी करू शकणार नाहीत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करणे आणि ऑपरेशनशी संबंधित काही नियम बदलले आहेत. हे नवीन नियम पेमेंट बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळता देशात कार्यरत असलेल्या सर्व बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी (NBFCs) अनिवार्य असतील. आरबीआयने बनवलेल्या नवीन नियमांचे वैशिष्ट्य म्हणजे आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड देणाऱ्या बँका ग्राहकांशी मनमानी करू शकणार नाहीत. या नियमांमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.1 जुलैपासून लागू होणार्‍या या नियमांबद्दल जाणून घेऊया..

हे ही वाचा (Read This) Sarkari Naukri 2022: भारत सरकारच्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) नोकरीची सुवर्ण संधी, लवकर अर्ज करा

कार्डधारकाला पैसे द्यावे लागतील

कार्ड बंद करण्यास सांगूनही कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने उशीर केल्यास त्याला दंड भरावा लागेल. कार्डधारकाने सर्व थकबाकी भरल्यानंतर कार्ड बंद करण्यास सांगितले, तर त्या संस्थेला 7 दिवसांच्या आत कार्ड बंद करावे लागेल. तसे न केल्यास दंड आकारला जाईल. अन्यथा, खाते बंद होईपर्यंत दररोज 500 रुपये ग्राहकाला दयावे लागतील. तसेच, तुम्ही कार्ड पोस्ट किंवा कुरिअरने पाठवण्याची सक्ती करू शकत नाही कारण अर्ज पोहोचण्यास बराच वेळ लागतो.

हे ही वाचा (Read This) डाळिंबाच्या उत्पादनात घट, खरीप हंगामात शेतकऱ्यांना होणार फायदा !, कृषी विभागाचा सल्ला जारी

माहिती वेळेवर द्यावी

कार्ड तात्काळ बंद करण्याबाबत कार्डधारकाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे माहिती देणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या संस्थेला त्यांच्या वेबसाइटवर हेल्पलाइन क्रमांक, ई-मेल आयडी, आयव्हीआर, वेबसाइट योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा (Read This) रिक्रूटमेंट 2022: टपाल विभाग रिक्त जागा भरणार, शिक्षण ८ वी पास , या तारखेपूर्वी करा अर्ज

एक वर्ष वापर न केल्याने बंद होईल

क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरला नसल्यास, बँक किंवा संस्था कार्डधारकाला कळवून ते बंद करू शकते. त्यानंतरही कार्डधारकाने ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास बँक ते कार्ड बंद करू शकेल. क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतरही क्रेडिट कार्डधारकाच्या कार्डमध्ये काही शिल्लक राहिल्यास ते बँक खात्यात हस्तांतरित करावे लागेल.

हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *