PH म्हणजे नेमके काय ?

Shares

तुम्ही शेती करत असाल तर PH हा शब्द तुम्ही नक्की ऐकला किंवा वाचला असेल. PH हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. अॅसिड व नॉन अॅसिड हे मोजायचे मापक म्हणजे PH होय. फवारणीसाठी पाण्याचा सामू (ph) जास्त महत्वाचं असतो. नाही.कोणतेही औषध मारताना जवळपास १% औषध व ९९% पाणी अशी आपण फवारणी करतो. अशा वेळी पाणी जर योग्य गुणवत्तेचे नसेल तर फवारणीचा फारसा फायदा होत नाही.
PH = Potential of Hydrogen,( संभाव्य हायड्रोजन)
PH हे नंबरांचे प्रमाण आहे. ते द्रव्याचे अॅसिड व नॉन अॅसिड गुणधर्म दाखवते. हे नंबर १ ते १४ मध्ये मोजले जातात. जर नंबर ७ पेक्षा कमी आले. तर ते द्रव्य अॅसिड मानले जाते .जर ते नंबर ७ पेक्षा जास्त आहे तर ते नॉन अॅसिड मानले जाते आणि ७ ही संख्या तटस्थ मानली जाते.नैसर्गिक पाण्याचा PH ७ असतो. तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच अॅसिड पण नाही आणि नॉन अॅसिड पण नाही. PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे तसेच औषधशास्त्र, खाद्यशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण शास्त्र, बांधकाम शास्त्र या सर्वासाठी महत्वाचे आहे.

PH चे संख्याशास्त्र –
३.५ – जहर अॅसिड
३.५ ते ४.४ – अत्यंत अॅसिडिक
४.५ ते ५.० – अतिशय जोरदार अॅसिड
५.१ ते ५.५ – जोरदार अॅसिड
५.६ ते ६.० – माफक अॅसिड
६.१ ते ६.५ – किंचित अॅसिड
६.६ ते ७.३ – तटस्थ (नैसर्गिक)
७.४ ते ७.८ – किंचित नॉन अॅसिड
७.९ ते ८.४ – माफक नॉन अॅसिड
८.५ ते ९.० – जोरदार नॉन अॅसिड
९ – अतिशय जोरदार नॉन अॅसिड

पीक उगवण आणि वाढीसाठी माती PH हे महत्वाचे आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रदूषकांमुळे एसिड पाऊस माती आणि पाण्यावरील आंबटपणा बदलतो, जी जीवसृष्टी आणि इतर प्रक्रियांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. दररोजच्या जीवनात बर्याच प्रतिक्रिया पीएचमुळे प्रभावित होतात, त्यामुळे त्याची गणना आणि मोजता येते हे जाणून घेणे उपयुक्त ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *