पपया फ्रुटीचा व्यवसाय करा आणि बक्कळ पैसा कमवा

Shares

अनेक युवकांना नवीन व्यवसाय करण्याची इच्छा असते.तर काही जणांना लघु उद्योग किंवा गृह उद्योग करायचा असतो. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना सुचत नाही.खूप कमी लोकांना माहिती आहे की कच्च्या पपई वर प्रक्रिया करून त्यापासून टुटी फ्रुटी बनवली जाते.हा व्यवसाय कमी गुंतवणूकमध्ये चांगला नफा मिळवून देणारा आहे.

टुटी फ्रुटी म्हणजे नेमके काय ?

  • कच्च्या पपईच्या तुकड्यावर साखर आणि कृत्रिम रंगाची प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून टुटी फ्रुटी बनते.

टूटी फ्रूटीचा वापर :-

१.मसाला पान
२. मुखवास
३. आईस्क्रीम
४. बेकरी उत्पादने इत्यादींमध्ये टूटीफ्रूटी चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

टूटीफ्रूटी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल :-

१. कच्ची पपई
२. साखर
३. कृत्रिम रंग
४. सायट्रिक ऍसिड
५. मीठ आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवी

-टुटी फ्रुटी बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री:-

१. साल काढण्यासाठी लागणारे यंत्र
२. पपईचे लहान तुकडे करण्यासाठी लागणारी क्युबिंग मशीन
३. पन्नास लिटर क्षमतेचा बॉयलर
४. कॅटल( शिजवण्याची यंत्र)
५. ड्रायर( वाळवणी यंत्र)
६. वजन काटा
७. पॅकिंग मशीन

प्रक्रिया पद्धत :-

१. तुटी फुटी तयार करण्यासाठी ताइवान ७८६ या जातीची कच्ची पपई वापरतात.
२. टुटी फ्रुटी तयार करताना अगोदर कच्च्या पपईची साल काढून घ्यावी लागते.
३. त्यानंतर पपईचे तुकडे करून ते १८ टक्के मिठाच्या द्रावणात २१ दिवस भिजत ठेवले जातात.
४. त्यानंतर तुकडे बाहेर काढून ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेउन त्याचे क्युबिंग मशीनद्वारे लहान तुकडे करतात.
५. या प्रक्रियेनंतर पपईचे तुकडे कॅटल मशीनमध्ये वाफेच्या सहाय्याने शिजवले जातात.
६. शिजवून घेतलेले पपईचे तुकडे तीस टक्के साखरेच्या व तीन टक्के सायट्रिक ऍसिडच्या पाण्यात २४ तास ठेवले जातात.
७. पपईचे तुकडे साखरेच्या पाण्यातून बाहेर काढून पुन्हा केटेल मशीनमध्ये शिजवले जातात.
८. त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो.
९. त्यानंतर ते वाळवणे यंत्राद्वारे वाळवून उत्तमरीत्या पॅकिंग केले जातात.

-यंत्रसामग्री साठी लागणारा खर्च:-

युनिट उभारण्यासाठी तर स्वतःची जागा राहिली तर उत्तम किंवा ज्या – त्या परिसरानुसार जागा भाड्याने किंवा विकत घ्यावी लागते.
१. पीलिंग मशीन( साल काढणी यंत्र) – १ लाख १००० रुपये
२. क्युबिंग मशीन( लहान तुकडे करणारे यंत्र) १,१०००० रुपये
३. स्वयंचलित बॉयलर २,२५००० रूपये
४. वाळवणी यंत्र ६०००० रुपये
५. वजन काटा आणि पॅकिंग मशीन २०, ००० रुपये.

       राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. हा प्रक्रिया उद्योग व्यवस्थित नियोजन करून आणि तंत्रज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास करून केला तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायद्याचा उद्योग ठरू शकतो.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *