अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागाकरिता उपाययोजना

Shares

भारतीय हवामान शास्त्र यांनी विदर्भात दिनांक १९ ते २३ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिट कमी अधिक प्रमाणात होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसासोबत गारपीट होउन संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान संभवते. अश्या वेळेस नुकसान झाल्यास बागांची कशी काळजी घ्यावी व असलेल्या संत्रा आणि मोसंबी आंबिया बहाराची व लिंबू हस्त बहारचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे

गारपीटमुळे बागांमध्ये झाडांची खालीलप्रमाणे हानी होते
गारपीटमुळे झाडांच्या फांद्यावरील आणि खोडावरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. कारण या जखमातून निरनिराळ्या बुरशीचे संक्रमण झाडांना होते यामध्ये प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीप्लोडीया, ऑल्टरनारिया या सारख्या बुरशी खरचटलेल्या जखमामधून शिरकाव करतात व रोगांचा प्रसार वाढतो, त्याचबरोबर झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात व काही गळतात. त्यामुळे झाडांची सुर्यप्रकाशात अन्नद्रव तयार करण्याची प्रक्रिया मंदावते.
• झाडावर मृग बहार ठेवला असल्यास मृग बहाराच्या फळांची व आंबिया बहारातील फुलांची व लहान फळांची गळ होते.

लवकारात लवकर जखमा भरून निघणे व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होणे करिता खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
• गारपीटमुळे फांद्या मोडल्या असल्यास आरीच्या साह्याने कापाव्यात व कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (९:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोडौं पेस्ट लावावी.
• झाडाची साल फाटली असल्यास १ टक्के पोटाशियम परमैग्नेट द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी व जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.
• झाडे उन्मळून पडली असल्यास त्यांना मातीची भर देऊन बांबू किवा बल्लीच्या साहय्याने आधार देऊन उभे करावे.
• झाडांची मूळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमोक्स्नील + मंकोजेब (मिश्र घटक) किंवामेटलअक्सिल + मंकोजेब (मिश्र घटक). या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी चे द्रावण
(८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकावे.
• त्वरित गारपीट ग्रस्त झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड (३ ग्रॅम/ लिटर पाणी) किवां बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना + ६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
• गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करावा. त्याकरिता गारपीट ग्रस्त झाडास १ किलो अमोनियम सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे त्याच बरोबर शक्य असल्यास चीलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रवाची (झिंक + कॅलशियम + फेरस सल्फेट मिश्र घटक ) ०.२ % (२ ग्रॅम/लिटर पाणी) प्रमाणात फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांवर कल्सियम नायट १ टक्का (१ किलो) + जिब्रेलिक अॅसिड २ ग्रॅम ते १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास झाडावरील पानांच्या संखेत वाढ होईल.
• मृग बहारची फळे गळाली असल्यास त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
• बऱ्याच वेळा उन्मळून पडलेल्या झाडाला फुलोर येतो व फळधारना होते, मुळातच झाड खगलेले असल्याने अशा झाडावर फळे घेऊ नयेत.
• बागेत आंबिया बहाराची फळे बोरा एवढी किवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची आहेत अशा बागेत झाडांना
• अन्नद्रव्य व संजीवक उपलब्धता होऊन फळे योग्य प्रकारे पोसण्याकरिता पोटाशियम नायवेट (१३:०:४५) १.५ किलो किवा ०:५२:३४ अधिक जिब्रलिक अॅसिड १.५ ग्रॅम यांचे आलटून पालटून १०० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.
• आंबिया बहारातील फळांची गळ होत असल्यास जिब्रेलिक अॅसिड १.५ ग्रॅम किवां एनएए १ ग्रॅम आणि युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• नवीन नवतीवर ढगाळ वातावरणात सियस सिला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो याचा झाडांच्या पानांवर व फळधारणीवर विपरीत परिणाम होतो. दुर्लक्ष केल्यास झाडावरील फुल गळ, फळ गळ संभवते तसेच हि कीड घातक असा ग्रीनींग रोगाचा सुद्धा प्रसार करते. त्यामुळे या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. संत्र्याला नवीन नवती आल्यानंतर नीम तेल १०० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. नीम तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे १० ग्रॅम डिटर्जट पावडर प्रति १० मिली नीम तेलात मिसळावे किवां थायोमिथोक्क्षम २५ डब्लूजी १ ग्रॅम या कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• काही भागात लिंबू फळपिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोळी कीड पानातील आणि फळातील रस शोषून घेते. पानांवर राख किंवा धुळे साचल्याप्रमाणे पानांचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. फळांवरील करड्या रंगाच्या असंख्य छटांमुळे फळाची प्रत बिघडते. याकरिता डायकोफॉल १८.५ ईसी २.७ मिलि किंवा डायफेनथुऑन ५०% पाण्यात मिसळणारे २ ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळून तीव्रतेनुसार फवारणी करावी.
• ओलावा जिथे अधिक आहे तिथे गोगलगाय/शंखी प्रकोप वाढतो त्याकरिता मेटाहेलडेहाइड २.५% भुकटीच्या अमिष गोळ्या तयार करून सुमारे ५०-८० ग्रॅम १०० चौरस फूट क्षेत्रफळाकरीता वापरुन गोगलगाय/शंखी यांच्या प्रादुर्भाव ज्या ठिकाणी किंवा झाडाच्या पायथ्याजवळ किंवा झाडांच्या ओळीत किंवा जिथे त्यांचा वावर आहे त्या ठिकाणी टाकाव्यात.
• पावसामुळे कागदी लिंबू वरील खैरया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे संरक्षणार्थ कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *