हिवाळ्यात अधिक उत्पन्नासाठी अंजीर पिकाची घ्या अशी काळजी

Shares

शेतकरी सध्या फळबाग लागवडीकडे जास्त वळत आहे. महाराष्ट्रामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून अंजीर पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात अंदाजे ४१७ हेक्टर जमीन अंजीर लागवडीखाली असुन पुणे जिल्ह्यात ३१२ हेक्टर क्षेत्र अंजीर लागवडी खाली आहे. हवामानात बदल झाला की अंजीर पिकावर त्याचा परिणाम दिसून येतो. थंडीच्या दिवसात पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. थंडीच्या दिवसात झाडाची, फळांची वाढ पूर्णपणे होत नाही.थंडीच्या दिवसात अंजीर बागेची काळजी कशी घ्यावी हे आपण आज जाणून घेणार आहोत.
अंजीर बागेचे व्यवस्थापन-
१. अंजीर बागेत वारा प्रतिबंधनासाठी पश्चिम व उत्तरेस निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, जांभूळ आदी पिके लावावीत.
२. जमिनीलगतच्या हवेचे उष्णतापमान थोडे वाढावेत तसेच अंजीर बागेवर थंडीचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी बागेस विहिरीचे, पाटाचे पाणी द्यावे.
३. बागेचे तापमान वाढावे यासाठी बागेत रात्री जागोजागी शेकोटी पेटवावी. जेणेकरून धुराचे दाट आवरण तयार होईल.
४. कडबा, गवत, पालापाचोळ्याचे आच्छादन अंजीर बागेच्या वाफ्यामध्ये शक्य असल्यास तयार करावेत.
५. कडबा, पाचट, तुराट्या पॉलीथीनचे छप्पर लहान लावलेले कलमे, रोपवाटिका रोपे, कलमे यांवर तयार करावेत.
६. जास्त प्रमाणात थंडी असल्यास २०० ते ३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड प्रमाणे जमिनीतून द्यावे. जेणेकरून फळगळती थांबेल.
७. पोटॅशिअम नायट्रेट चे कमी तीव्रतेचे द्रावण झाडांना दिल्यास काटकपणा वाढू शकतो.
८. अंजिराचे झाड निरोगी असल्यास ते थंडी सहन करू शकते. त्यामुळे अंजीर पिकाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

अंजीर पिकाचे थंडीच्या दिवसात योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास चांगले व जास्त उत्पादन मिळते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *