या दिवशी मिळणार किसान सन्मान निधी योजनेचा ११वा हफ्ता ?

Shares

सरकार ( Government) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. अशीच एक योजना सरकारने ( Government Scheme) शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्धेशाने राबवलेली आहे. ती योजना म्हणजे किसान सन्मान निधी योजना. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होते. या रकमेचा दहावा हफ्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता याचा पुढचा हफ्ता म्हणजेच ११ वा हफ्ता हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याचे संकेत सरकारकडून दिले जात आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात सरकारकडून वरचेवर बदल ?
पीएम किसान योजने ( PM Kisan Scheme) अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये जमा केले जातात. ही रकम २ हजार प्रमाणे ३ हफ्त्यामध्ये जमा केली जाते. या योजनेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आता पीएम किसान योजनेसाठीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येत आहेत.
आता रेशन कार्ड शिवाय या योजनेचा लाभ घेता नाही येणार. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर रेशन कार्ड ची माहिती देणे गरजेचे आहे. जे शेतकरी त्यांची माहिती देणार नाहीत त्यांना ११ वा हफ्ता मिळण्याची शक्यता कमी आहे, असे सांगण्यात येत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *